Chhoti Badi Baatein
- हिंदी निबंध संग्रह - Hindi Essay Collection
Diwali Nibandh in Marathi – दिवाळी निबंध मराठी
(दिवाळी निबंध मराठी – Diwali Essay in Marathi – Diwali Festival Essay in Marathi – Diwali Nibandh in Marathi – Short Diwali Essay in Marathi – Diwali Information in Marathi Essay)
मित्रांनो दिवाळी हा भारतीयांचा मुख्य सण आहे आणि तो भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे, ज्याच्या आगमनामुळे आपल्या समाजातील विविध स्तरातील लोक एकत्र येत असल्याने सणाचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व वाढते.
आजच्या लेखाद्वारे आम्ही तुमच्यासोबत विविध शब्द मर्यादांमध्ये “ दिवाळी निबंध मराठी (Diwali Essay in Marathi) ” शेअर करत आहोत.
Table of Contents
Diwali Festival Essay in Marathi – (10 lines) दिवाळी वर मराठी निबंध
10 Lines on Diwali Festival Essay in Marathi
- दिवाळी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, ज्याला “दीपावली” असेही म्हणतात.
- दिवाळी हा हिंदू संस्कृतीला आधार देणारा महत्त्वाचा सण आहे.
- दिवाळी हा आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुध्द द्वितीयेपर्यंत पाच दिवसांचा सण असतो.
- दिवाळीच्या सणातल्या पाच दिवसांत प्रत्येक घरी कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास केली जाते.
- दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची परंपरा असते. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून लोक तिला आपल्या घरात स्थिर होण्याची विनंती करतात.
- दिवाळीच्या दिवशी घरासमोर सुंदर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात.
- फटाक्यांबरोबरच मुलांना दिवाळीत नवीन आणि छान कपडे आणि विविध खेळणीही मिळतात.
- दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला जातो आणि इतरांनाही शेअर केला जातो.
- दिवाळीच्या काळात घर, कार्यालय, कारखाने सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.
- दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो त्यामुळे सर्वत्र एक प्रकाराचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
Short Essay On Diwali In Marathi – (200 शब्द ) दिवाळी निबंध मराठी
दिवाळी हा हिंदूंचा अतिशय लोकप्रिय आणि महत्त्वाचा सण आहे. दिवाळी हा आपल्या भारतात साजरा होणारा सर्वात मोठा सण आहे. तसे, आपल्या भारतात अनेक सण साजरे केले जातात. पण दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. हा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो.
त्रेतायुगात 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान श्री राम अयोध्येत परतल्याचा आनंदोत्सव साजरा करताना अयोध्येत सर्वत्र दिवे लावण्यात आले होते, त्यामुळे संपूर्ण अयोध्या स्वर्गासारखी उजळून निघाली होती. भगवान रामाच्या अयोध्येत आगमन झाल्याबद्दल दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते.
दिवाळी सण हा 5 दिवसांचा सण आहे. वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत हा सण साजरा केला जातो. या उत्सवातील महत्त्वाच्या दिवसांमध्ये वसु-बारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज यांचा समावेश होतो. दिवाळी हा सण प्रामुख्याने उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.
दसऱ्यानंतर 20 दिवसांनी दिवाळी येते. दसऱ्यानंतर प्रत्येक घरात दिवाळीची तयारी सुरू होते. घराची डाग-डुजी करणे, साफसफाई करणे, रंगकाम करणे, नवीन कपडे खरेदी करणे, विविध प्रकारची मिठाई घरा-घरामध्ये बनवली जाते.
सर्वत्र दिवे आणि आकाश कंदील लावले जातात, प्रवेशद्वारावर, अंगणात रांगोळ्या काढल्या जातात, फटाके फोडले जातात आणि स्वादिष्ट फराळाचा आस्वादही घेतला जातो.
दरवाजावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधलेले जातात. नवीन कपडे घालून फटाके फोडण्याचा आनंद घेतल्या जातो. दिवाळीच्या दिवशी लोक एकमेकांकडे जातात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात, मिठाई देतात. अशा प्रकारे दिवाळी हा एक आनंदाचा सण आहे जो आपल्या जीवनात आनंद, प्रेम आणि बंधुभाव पसरवतो.
Essay On Diwali In Marathi – (500 शब्द ) दिवाळी वर मराठी निबंध
दिवाळीचे दुसरे नाव ‘दीपावली’ आहे. या सणाचा अर्थ ‘दीपोत्सव’ किंवा ‘प्रकाशोत्सव’ असा आहे. दीपोत्सवात घरांच्या अंगणात अगणित दिवे लावले जातात. दिव्यांच्या या असंख्य रांगा आकाशातील ताऱ्यांसारख्या दिसतात.
दिवाळी सणासुदीचे दिवे सुंदर, रंगीबेरंगी आणि निसर्गाचे प्रतिनिधित्व करतात. दिव्यांच्या या तारांमुळे रात्रीच्या अंधारात घरे अधिक सुंदर दिसतात. लोकांच्या घरांचे अंगण जणू दिव्यांच्या ओळीने सजले जातात. या ओळी एक चैतन्यशील वातावरण तयार करतात जे प्रत्येकाला हवेहवेसे वाटते.
या उत्सवाची सुरवात ‘वसुबारस’ पासून होते आणि ‘भाऊबीज’ साजरा केल्यानंतर, दिवाळीची सांगता होते. दिवाळी हा सर्व वयोमान्य, मुले, स्त्री-पुरुषांच्या हृदयातील प्रेमाचा सण आहे. दिवाळी मुळे प्रत्येक घराला एक अनोखे रूप आणि अनुभव येते. हा सण नवीन कपडे, दागिने आणि सामान्य घरगुती वस्तू खरेदी करण्याची संधी आहे. याबरोबरच फटाक्यांची आतिशबाजी आणि विविध दिवाळी फराळाच्या स्वादाची अनोखी भरपूर अनुभवायला मिळते.
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपली प्राचीन संस्कृती आपल्याला सर्व प्राण्यांशी प्रेमाने वागण्याची शिकवण देते. या शिकवणीनुसार वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यांना गोड खाद्य पदार्थ दिले जाते. गायीपासून आपल्याला दूध व इतर फायदे मिळतात आणि शेतीसाठी बैलांची मदत महत्त्वाची आहे. या गोष्टी लक्षात ठेवून गोधनाची कृतज्ञतापूर्वक पूजा केली जाते.
धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद यांचा विशेष मान असतो. ह्या दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.
नरक चतुर्दशी हा दिवाळीचा मुख्य पहिला दिवस आहे. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे, नवीन वस्त्रे परिधान करायची, देवदर्शन करायचे, आणि सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी फराळ करून ह्या दिवसाचा आनंद साजरा करायचा असतो.
ह्या दिवसाची एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे, या कथेअनुसर भगवान श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली होती तो हा दिवस. दुष्टांचा नाश आणि सुटकेचा आनंद ही या दिवसातील एक महत्त्वाची घटना आहे आणि याचे कारण म्हणजे या दिवसामागचा आनंद साजरा करण्यासाठी ही कथा सांगितली जाते.
अश्विन महिन्याचे शेवटचे दोन दिवस आणि कार्तिक महिन्याचे पहिले दोन दिवस – या चार दिवसांच्या मुख्य दिवाळीच्या अवसरी, आपल्याला विशेषपणे आकर्षक आणि महत्त्वपूर्ण कामांसाठी सजवायला मिळतात. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी, घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, आणि ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरोघरी सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा केली जाते. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतात. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनानंतर, आरोग्य लक्ष्मी (केरसुणी) ह्या देवीची पण पूजा केली जाते. लक्ष्मी पूजनाच्या नंतर, फटाक्यांची आतिशबाजी केल्यानंतर, त्या दिवसाच्या आनंदाच्या घडणारांमध्ये आपल्याला सहभागी व्हायला मिळतो.
या नंतर पाडवा, असा एक दिवस आहे जो बलिप्रतिपदा आणि साडेतीन मुहुर्तांच्या एक मुहुर्तातला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी, अनेक नवे प्रकल्प सुरू केले जातात. पाडव्याच्या दिवशी, पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून विविध वस्तू, दागिने, किंवा साडी उपहार देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच “यमद्वितीया” किंवा “भाऊबीज” असे म्हणतात. बहीण आणि भाऊ यांच्यातील उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहीण भावाला आंघोळ घालते, गोड अन्न अर्पण करते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू ओवाळणी घालतो.
दिवाळीच्या सणातला लहान मुला-मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला बनवणे, त्यावर चित्रे मांडणे, फटाके उडवणे आणि सुट्यांचा आनंद घेणे असा आणि स्त्रियांसाठी संध्याकाळी दारापुढे छान रांगोळ्या काढणे आणि स्वादिष्ट व्यंजन तयार करणे, ह्या सणाच्या विशेष आनंदाच्या घडणारांमध्ये एक आहे.
एकमेकांना भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड्स वगैरे देऊन आनंद साजरा केला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश आणणारी ही दिवाळी सर्वांना प्रिय आहे. जो तो त्याच्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो आणि आनंद घेतो. दिवाळी म्हणजे अमर्याद आनंद, दिवाळीच्या अनेक सुखद आठवणी मनात अनेक दिवस रेंगाळत राहतात.
———————————————-//
अन्य लेख पढ़ें:
- 110+ दिवाली की शुभकामनाएं संदेश – Diwali Wishes In Hindi
- दिवाली पर हिंदी में कविताएँ – Diwali Poems in Hindi
- दीवाली पर संस्कृत निबंध – Essay on Diwali in Sanskrit
- दिवाली पर निबंध – Essay on Diwali in Hindi
- दिवाली के बारे में जानकारी और रोचक तथ्य – Information & Interesting Facts About Diwali
- 50+ भाई दूज पर शुभकामना संदेश – Best wishes message on Bhai Dooj in Hindi
- भाई दूज क्यों मनाया जाता है? भाई दूज की कहानी और महत्व हिंदी में
Enjoy this blog, Please share this
- Share on Tumblr
Leave a Reply Cancel reply
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Notify me of follow-up comments by email.
Notify me of new posts by email.
दिवाळी वर मराठी निबंध | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | essay on diwali in marathi
माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi :- दिवाळी हा संपूर्ण भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. विशेष बाब म्हणजे हा सण जवळपास प्रत्येकाचाच आवडीचा सण आहे. सर्वांनाच दिवाळी हा सण खूप आवडतो. त्यामुळेच आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध essay on diwali in marathi लिहिलेला आहे.
दिवाळी वर मराठी निबंध सर्वच विद्यार्थांसाठी खूपच उपयुक्त आहे. माझा आवडता सण दिवाळी निबंध my favourite festival diwali essay in marathi हा तुम्हाला नक्कीच आवडेल.
दिवाळी वर मराठी निबंध | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | essay on diwali in marathi
दिवाळी वर 10 ओळीचा निबंध | 10 lines on my favourit festival diwali in marathi.
- दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे.
- हा सण इंग्रजी दिनदर्शिका नुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो. या सणाची तारीख निश्चित नसते.
- दिवाळीला दीपावली किंवा दीपोत्सव असे देखील म्हटले जाते.
- दिवाळीच्या दिवशी घराची आणि अंगणाची स्वच्छ्ता केली जाते, अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते.
- दिवाळीच्या दिवशी अंगाला उठणे लाऊन अंघोळ करण्याची प्रथा आहे.
- दिवाळीच्या दिवशी अंगणात मातीचे दिवे लावले जातात. त्यामुळे या सणाला प्रकाशाचा सण म्हणून देखील ओळखले जाते.
- दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे भाहुबिज होय. या दिवशी बहीण भावला ओवाळून त्याच्या आरोग्यासाठी प्रेरणा करते.
- लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाची पूजा केली जाते.
- दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दिवू लावले जातात आणि लहान मुले फटाके फोडून आनंद व्यक्त करतात.
- दिवाळीच्या दिवशी लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे आणि गुलाब जमून हे फराळाचे पदार्थ खायला मिळतात. मला दिवाळी हा सण खूप आवडतो.
माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi (700+ शब्दात)
भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. भारत देशात संपूर्ण वर्षभर विविध धार्मिक , सांस्कृतिक आणि सामाजिक सण उत्सव साजरे केले जातात. यातून सामाजिक बांधिलकी जोपासली जातेच शिवाय लोक मतभेद विसरून एकत्र जमतात.
मला तसे तर हिंदू संस्कृतीमध्ये साजरे केले जाणारे सर्वच सण उत्सव आवडतात पण दिवाळी हा माझा सर्वात जास्त आवडणारा सण आहे. म्हणजेच माझा आवडता सण दिवाळी आहे. या सणाला दिवाळी किंवा दीपावली असे देखील म्हटले जाते. अनेक कवी आणि लेखक दिवाळी या सणाचे वर्णन दीपोत्सव असे देखील करतात. कारण या सणाच्या दिवशी सायंकाळी दिवे लावण्याची प्रथा आहे.
- माझी आजी मराठी निबंध
- माझी शाळा मराठी निबंध
- झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध
दिवाळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा सर्वात मोठा हिंदू सण आहे. हा सण केवळ हिंदूच नव्हे तर इतर धर्मीय लोक देखील साजरा करताना दिसतात. या सणाचे विशेष म्हणजे यातून खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकी जोपासली जाते.
दिवाळी (essay on diwali in marathi) हा सण आश्विन या मराठी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. इंग्रजी दिनदर्शिका नुसार दिवाळी हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये येतो. पण या सणाची तारीख निश्चित नसते. हा सण कधी ऑक्टोबर महिन्यात येतो तर कधी नोव्हेंबर महिन्यात येतो. हा सण भारताबाहेर विदेशात राहणारे हिंदू धर्मीय लोक देखील मोठ्या प्रमाणात साजरा करताना दिसून येतात.
दिवाळी सणाच्या निमित्ताने शाळेला पंधरा ते वीस दिवस सुट्या असतात. तसेच ऑफिस आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील आठ ते दहा दिवस सुट्या असतातच. त्यामुळे घरातील सर्व मंडळी एकत्र असतात. तेंवहापासून दिवाळी सणाच्या तयारीला सुरुवात होते.
गावातील आम्ही सर्व मित्र एकत्र जमतो आणि सुंदर किल्ले बनवतो. किल्ले बनवण्यात एक वेगळीच मजा असते. तसेच आम्ही संपूर्ण गावासठी एक मोठा आकाश कंदील तयार करतो. यासाठी आम्हाला गावातील इतर ज्येष्ठ मंडळींची मदत देखील लाभते. नंतर हा आकाशकंदील गावच्या मध्यभागी लावण्यात येतो.
आमच्या घरी देखील मी आणि माझी बहिण मिळून एक छोटा आकाश कंदील बनवतो. आई आणि आत्या फराळाचे पदार्थ बनवण्यात व्यस्त असतात.लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे असे अनेक पदार्थ बनवण्यात येतात. यात सर्वांचे आवडते गुलाब जमून तर मला खूपच आवडतात. दिवाळीच्या अगोदर आम्ही सर्वजण मिळून घराची आणि अंगानाची स्वच्छता करतो.
दिवाळीचा सण (diwali festival essay in marathi) हा तीन किंवा पाच दिवसांचा असतो. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं आणि दुसरं पाणी असतं. तिसऱ्या दिवशी भाऊबीज आणि लक्ष्मीपूजन असते.दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगाला उठणे लावून आंघोळ केली जाते.
घरातील सर्व मंडळी नवीन कपडे परिधान करतात आणि आनंदाने फराळाचे पदार्थ खातात. या दिवशी पाहुण्यांना आणि मित्रांना घरी फराळाला बोलावण्याची प्रथा आहे. लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. घरातील प्रौढ मंडळी लहान चिमुकल्यांना पैसे आणि भेटवस्तू देतात.
ताई अंगणात सडा टाकून सुंदर रांगोळी काढते. सायंकाळी अंगणात दिवे लावले जातात. घरातील मंडळी आणि लहान मुले फटाके वाजवून आनंद व्यक्त करतात. फटाके वाजवणे लहान मुलांना खूप जास्त आवडते.
भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्य साठी देवाकडे प्रार्थना करते. भाऊ देखील बहिणीला भेटवस्तू देतो आणि रक्षण करण्याचे शपथ घेतो. त्याचप्रमाणे त्याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाची पूजा केली जाते.
- मी शिक्षक झालो तर मराठी निबंध
दिवाळी हा सण खूपच आनंदाचा आणि जल्लोषाचा असतो. यात मनोरंजन तर होतेच आणि समाजातील लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. त्यामुळे दिवाळी हा सण मला खूप खूप आवडतो.
टीप: मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला दिवाळी वर मराठी निबंध, माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi लिहून दिलेला आहे. हा सण इयत्ता १,२,३,४,५,६,७,८,९,१० पर्यंत कोणत्याही वर्गासाठी तुम्ही वापरू शकता.
माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्ही दिवाळीला कश्या प्रकारे मज्जा करता, ते देखील कमेंट करून कळवा, धन्यवाद…!
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
दिवाळी वर मराठी निबंध, Essay on Diwali in Marathi
आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दिवाळी वर मराठी निबंध (essay on Diwali in Marathi). दिवाळी सणावर लिहिलेला हा निबंध मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी दिवाळी सणावर मराठी माहिती निबंध (Diwali information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर विषयांवर सुद्धा मराठीमध्ये निबंध आहेत, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.
दिवाळी वर मराठी निबंध, Essay on Diwali in Marathi
भारत हा सणांचा देश मानला जातो. या सर्व सणांमध्ये होली, दिवाळी, दसरा, नवरात्री हे प्रमुख सण आहेत. यात सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळी हा सण दिव्यांचा उत्सव आहे. दिवाळी हा हिंदूंचा सर्वात प्रमुख उत्सव मानला जातो. लोक मोठ्या उत्साहाने दीपावली हा सण साजरा करतात.
परिचय
दीपावलीचा सण पाच दिवस साजरा केला जातो. दसरा झाला कि दीपवालीची तयारी सुरू होते. जे लोक नोकरी करतात त्यांना दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी काही दिवसांची सुट्टी दिली जाते जेणेकरून ते आपल्या कुटुंबासह दिवाळी साजरी करू शकतील.
दीपावलीचा अर्थ
दीपावली हा शब्द संस्कृतमधून आला आहे. दीप आणि आवली या दोन शब्दांनी दीपावली हा शब्द बनला आहे आणि याचा अस्र्थ होतो दिवे लावून सजवलेला सण. दिवाळीचा हा सण कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरा केला जातो. उन्हाळा आणि पावसाचे हंगाम संपल्यानंतर हिवाळा ऋतूच्या स्वागतात हा उत्सव साजरा केला जातो.
दीपावलीचा इतिहास
दीपावलीचा सण प्राचीन काळापासून भारतात साजरा केला जात आहे. या महोत्सवाचा इतिहास वेगवेगळ्या राज्यांतील लोक मानतात, परंतु बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा भगवान राम हे १४ वर्षांच्या वनवासानंतर रावणाचा पराभव करून अयोध्याकडे परत आले, त्यानंतर अयोध्या लोकांनी त्याचे स्वागत करण्यासाठी दिवे पेटविले.
ज्या दिवशी भगवान राम परत आले त्या दिवशी अमावस्या होती. ज्यामुळे तेथे काहीही दिसत नव्हते, म्हणून अयोध्या लोकांनी तेथे दिवे लावले. असेही एक कारण आहे की हा दिवस अंधारावर प्रकाशाचा विजय मानला जातो.
जैन धर्माचे लोक सुद्धा दिवाळी हा सण साजरा करतात कारण याच दिवशी जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर महावीर स्वामी यांना मोक्ष प्राप्ती झाली होती आणि योगायोगाने त्याचा शिष्य गौतम यांना या दिवशी ज्ञान प्राप्त झाले होते.
शीख समुदाय सुद्धा हा हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. या दिवशी १५७७ मध्ये अमृतसरमध्ये गोल्डन मंदिराचा पाया घातला गेला. तसेच, हरगोविंद सिंह यांना आजच्याच दिवशी ग्वाल्हेरच्या तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते.
आर्या समाजाचे संस्थापक स्वामी रामातीर्थ यांना सुद्धा याच दिवशी मोक्ष मिळाला होता.
दिवाळीचे महत्त्व
दिवाळीचा सण सर्व वर्गातील लोकांसाठी महत्वाचा आहे. हा हिंदूंचा सर्वात मोठा उत्सव मानला जात आहे. सर्वात मोठा उत्सव असल्याने सर्वांचा विश्वास या उत्सवाशी संबंधित आहे. या महोत्सवाचे स्वतःमध्ये अनेक प्रकारचे महत्त्व आहे
आध्यात्मिक महत्त्व
दिवाळी हा सण अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक कथांशी संबंधित आहे. या उत्सवाचा पाया चांगुलपणावर अवलंबून आहे, म्हणून जेव्हा जेव्हा हा उत्सव येतो तेव्हा सर्व लोक आनंदाने हा उत्सव साजरा करतात. या उत्सवात लोक अध्यात्माकडे जातात आणि यामुळे चांगल्या कल्पना येतात.
सामाजिक महत्त्व
दीपवालीच्या उत्सवाचे सामाजिक महत्त्व देखील खूप मोठे आहे, कारण सर्व धर्मांचे लोक हा उत्सव साजरे करतात. या दिवशी सर्व लोक पूजा करतात. आजच्या व्यस्त जीवनात, लोकांना एकमेकांना भेटणे अवघड होऊन जाते अशा वेळी दिवाळी सारखा सण एकमेकांना भेटवून देण्याचे काम करतो. म्हणूनच या महोत्सवाचे सामाजिक महत्त्व आणखी वाढते.
आर्थिक महत्त्व
दीपावलीच्या उत्सवात भारतीय जोरदार खरेदी करतात. सर्व लोक त्यांच्या घरात भेटवस्तू, सोन्याचे चांदीचे दागिने, भांडी, वस्तू, कपडे, मिठाई इ. खरेदी करतात. हिंदू धर्माच्या लोकांचा असा विश्वास आहे की या दिवशी खरेदी केल्याने घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता उद्भवत नाही आणि या दिवशी खरेदी केल्याने ती वस्तू भरभराट होते, म्हणूनच, यावेळी बाजारात अधिक खरेदी विक्री होते. ज्यामुळे लोकांचे उत्पन्न वाढते.
दिवाळीच्या उत्सवामागील सर्वात जुने आर्थिक महत्त्व म्हणजे भारतातील जवळजवळ सर्व पिके पावसाळ्यावर अवलंबून असतात, त्यामुळे दिवाळीच्या उत्सवाच्या काही दिवस आधी पीक पिकण्यास तयार असते. म्हणून शेतकरी या पिकाचे उत्पन्न बाजारात विकून पैसे मिळवतात. म्हणूनच या महोत्सवाचे आर्थिक महत्त्व आणखीनच वाढते.
ऐतिहासिक महत्त्व
दिवाळीच्या उत्सवाच्या दिवशी अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. ज्यामुळे या महोत्सवाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढते. आज १४ वर्षांचा वनवास संपल्यानंतर भगवान राम अयोध्या येथे परतले.
आजच्याच दिवशी समुद्रमंथन होऊन आई लक्ष्मीचा देवीचा जन्म झाला.
स्वामी रामतीर्थ यांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. दिवाळीच्या पवित्र प्रसंगी आर्य समज यांची स्थापना झाली.
या दिवशी, मुघल साम्राज्याचा सर्वात मोठा सम्राट अकबरने ४० फूट उंच दीपस्तंभ लावून दिवाळी महोत्सव साजरा करण्यास सुरवात केली. याच कारणास्तव हिंदू आणि मुस्लिम लोकांचा एकमेकांबद्दलचा तिरस्कार संपला.
दिवाळी दरम्यान साजरे केले जाणारे सण
दीपावलीचा हा सण ५ दिवस असतो.
धनत्रयोदशी
दिवाळीचा पहिला दिवस हा धनत्रयोदशी असतो. धनत्रयोदशीला लोक धनतेरस असेही म्हणतात. या लोक त्यांच्या घरी काही नवीन भांडी विकत घेतात, सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करतात. लोकांचा असा विश्वास आहे की या दिवशी खरेदी केल्याने घरात लक्ष्मी नांदत राहते, घरात काहीच कमी राहत नाही.
नरक चतुर्दशी
दिवाळीचा दुसरा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो, कारण याच दिवशी भगवान कृष्णाने राक्षस नरकासुराचा वध केला. हा दिवस काही लोक लहान दिवाळी म्हणूनही साजरा केला आहे. या दिवशी घराबाहेर ५ दिवे लावले जातात. प्राचीन परंपरेनुसार, आज लोक त्यांच्या डोळ्यांमध्ये दिव्याची काजळी लावतात. त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे डोळे खराब होत नाहीत.
लक्ष्मी पूजन
दिवाळीचा तिसरा दिवस हा या उत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते, तसेच सरस्वती, गणेश यांची देखील पूजा केला जाते.
गोवर्धन पूजा
दिवाळीच्या चौथ्या दिवशी गोवर्धनाची पूजा केली जात आहे, कारण आज इंद्राच्या रागामुळे झालेल्या मुसळधार पावसापासून लोकांना वाचवण्यासाठी भगवान कृष्णाने आपल्या एका बोटावर गोवर्धन पर्वत उचलला होता. आज स्त्रिया शेण ठेवून पारंपारिक उपासना करतात.
भाऊबीज
दिवाळीच्या उत्सवाचा शेवटचा दिवस हा भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. बहिणी या दिवशी भावाला ओवाळतात, तिलक लावतात, मिठाई खायला देतात आणि त्या बदल्यात भाऊ त्यांचे संरक्षण करण्याचा वचन देतात आणि त्यांना चांगली भेट देतात.
दिवाळी कशी साजरी करावी
दिवाळी आपण आई लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी साजरी करतो. आपण कितीही व्यस्त असलो तरी, या महोत्सवाच्या परंपरा उत्सवाच्या संस्कृती, सजावट, पूजा-विधी इत्यादी आपण लक्ष देऊन करतो
देव देवतांच्या मूर्तीचे पूजन
असा विश्वास आहे की आपल्या घरात देव देवतांच्या शुभ प्रतीकांची उपासना केल्याने संपत्ती मिळते, म्हणून दिवाळीतील सर्व लोकांनी त्यांच्या घरी गणेश आणि लक्ष्मीची मूर्तिपूजा केला पाहिजे. दरवाजा आणि घेरी येणाच्या ठिकाणी स्वस्तिक, लक्ष्मी, गणेश, रिद्धी सिद्धी इत्यादीचे शुभ प्रतीक पूजले पाहिजे.
रांगोळी
रांगोळी आई लक्ष्मीसाठी खूप लोकप्रिय आहे, ज्या दारावर रांगोळी बनविली जाते, आई लक्ष्मी नक्कीच तिथे राहते. रांगोळीशिवाय हा उत्सव अपूर्ण वाटतो, म्हणून वेगवेगळ्या रंगांनी आपले अंगण आणि परिसर सजवा. आपल्याला रांगोळीपासून एक सकारात्मक ऊर्जा सुद्धा मिळते
कलश स्थापना
घराच्या आनंदासाठी या उत्सवात कलश स्थापित करणे आवश्यक आहे, हळद, कुंकू, सुपारी इ. ठेवून पाण्याने भरलेला कलश आंब्याच्या पाने तांब्यावर ठेवून नारळ ठेवा आणि चारी बाजूंनी फुलांनी सुशोभित करा.
गणेश मूर्ती स्थापना
गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात. हे शुभ कार्याचे प्रतीक आहे. उत्सवाला एक नवीन रूप देण्यासाठी आपण आपल्या घराच्या हॉलमध्ये गणेशाची मूर्ती स्थापित करू शकता. हे आपल्या घरातील नकारात्मक उर्जा संपवण्यात आणि आध्यात्मिक शांतता निर्माण करण्यात मदत करेल.
दिव्याचे महत्त्व
लक्ष्मी पुजनमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे. आपल्या घराच्या प्रत्येक ठिकाणी लहान चिकणमाती दिवे ठेवले पाहिजेत. आजकाल, दिवे वेगवेगळ्या सुंदर रंगांमध्ये आणि डिझाईन्समध्ये देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे घराचे सौंदर्य आणखी वाढते. हा दिवा केवळ घरातूनच नव्हे तर मनातुन देखील निराशेचा अंधार मिटवितो. दिवा सकारात्मक उर्जाचे प्रतीक आहे, ज्याचा प्रकाश अंधार संपवितो.
दरवाजे सजवा
दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत आपल्याला सुंदर तोरणे मिळतात. मुख्य आणि घरातील दरवाज्यांना आपण हि तोरणे लावून त्यांचे सौंदर्य अजून वाढवू शकतो. त्याचप्रमाणे आपण बनवून आंब्याची पाने आणि फुले यांचा वापर करून सुद्धा दरवाजे सजवू शकतो आणि दिवाळीवर त्याचे विशेष महत्त्व आहे
फुलांनी घर सजवा
फुलांशिवाय घराची सजावट अर्धवट वाटते, फुलांमुळे घरात पवित्र वातावरण तयार होते. जर आपल्याकडे जास्त वेळ नसेल तर आपण कमीत काम वेळात फुलांचा वापर करून आपले घर आणि दरवाजा सजवू शकता.
अंगणात गेरुपासून सुंदर डिझाइन बनवा
दिवाळीवेळी गेरूच्या सुंदर कल्पनांनी घराचे अंगण आणि चिखलमातीच्या भिंतीं अतिशय सुंदर आणि मोहक दिसतात.
भारत सोडून इतर विविध देशांमध्ये दिवाळी
दिवाळी हा एक उत्सव आहे जो केवळ भारतातच नव्हे तर जगातील बऱ्याच देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारत वगळता हे सण म्हणजे मलेशिया, अमेरिका, नेपाळ, सिंगापूर, मॉरिशस आणि श्रीलंकेमध्येही खूप आनंदोत्सव साजरा केला जातो.
मलेशिया
मलेशियामध्ये भारतासारखीच दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. हा उत्सव इथले लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. दिवाळीच्या दिवशी, सर्व लोक सर्वांसाठी अन्नाची व्यवस्था करतात आणि दिवसभर लोक चांगले खाण्याचा आनंद घेतात आणि एकमेकांना भेटतात. दिवालीचा हा सण मलेशियामध्ये सामाजिक सद्भावना म्हणून साजरा केला जातो.
अमेरिका
भारतीय वंशाच्या बऱ्याच लोकांचे अमेरिकेतही वास्तव्य आहे, म्हणून दिवाळीचा सण उत्साहाने साजरा केला जातो. २००३ मध्ये पहिल्यांदा व्हाईट हाऊस मध्ये दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात आला. तेव्हापासून जवळजवळ संपूर्ण अमेरिकेने हा उत्सव स्वीकारला. ४ लाख भारतीय लोक अमेरिकेत राहतात.
नेपाळ
नेपाळ हा आपल्या भारत देशाचा शेजारील देश आहे जिथे दिवाळीच्या उत्सवाच्या दिवशी नवीन वर्ष साजरे केले जाते. नेपाळमध्ये दीपावली तिहार म्हणून ओळखली जातात आणि ५ दिवस हा सण साजरा देखील केला जातो. या महोत्सवात इथले लोक दान धर्म करतात आणि प्राणी पक्ष्यांनाही खाद्य देतात. नेपाळमधील लोकांचा असा विश्वास आहे की या दिवशी दान करणे चांगले वर्ष ठरते.
सिंगापूर
सिंगापूरमधील दिवाळी सण सणासुदीची सुट्टी आहे. भारतीय वंशाच्या तमिळ समुदायाचे लोक आहेत जे दीपौलीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. दिवालीच्या उत्सवात सिंगापूरची बाजारपेठे सुद्धा गजबजून गेलेली असते.
मॉरिशस
या देशातील सुमारे ४४% लोकसंख्या भारतीय लोकांची आहे, ज्यामुळे दिवाळीच्या उत्सवाच्या दिवशी हिंदू संस्कृती मोठ्या उत्साहाने सुट्टी साजरी करतात. मॉरिशस मध्ये हिंदी भाषा देखील बोलली जाते.
श्रीलंका
श्रीलंकेमध्ये सुद्धा दीपवालीच्या उत्सवाची सार्वजनिक सुट्टी असते, जिथे भारतीय वंशाचे तामिळ लोक मोठ्या प्रमाणात राहतात आणि त्यामुळे येथे भारतीय संस्कृतीची झलक दिसते. दीपावली येथे मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.
दिवाळी हा सण वेगळ्या पद्धतीने कसा साजरा करावा
दीपावली आणि पुजन विधींचा उत्सव साजरा करण्याचा मार्ग सर्वत्र सारखाच आहे. तरीही आपण हा सण अशा प्रकारे साजरा करू शकतो कि हा सण केवळ आपल्यासाठीच नाही तर इतरांनीही हा दिवस विशेष बनवू शकतो.
दिवाळीसाठी लागणारे साहित्य छोट्या विक्रेत्यांकडून विकत घेतल्यास, त्यांना सुद्धा आर्थिक सहकार्य होईल कारण तेही वर्षभर या उत्सवाची वाट पाहत असतात. जेणेकरून ते तयार केलेल्या वस्तू येऊन विकू शकतील.
- गुढीपाडवा वर निबंध मराठी
इलेक्ट्रिक वस्तू पासून बनवलेले दिवे वापरण्यापेक्षा आपण आपल्या देशातील लहान व्यापारी आणि कुंभार यांच्याकडून दिवे खरेदी करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सुदृढ करून देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यास मदत करू शकतो आणि दिवाळीचा पारंपारिक देखावा टिकवून ठेवण्यास हातभार लावू शकतो.
आपल्यापैकी बरेचजण दिवाळीला फटाके, कपडे खरेदी करतात आणि उत्सव साजरा करतात. या जगात असे सुद्धा काही लोक आहेत ज्यांच्याकडे हे सगळे खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतात. आपण गरीब आणि गरजू लोकांना ब्लँकेट्स, मिठाई आणि भेटवस्तू यासारख्या वस्तूंचे वितरण केल्यास ते लोक सुद्धा हा सण साजरा करू शकतात
आपल्या सर्वांना माहित आहे की दिवाळीच्या निमित्ताने फटाके मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतात. आपल्याला हे समजून घेतले पाहिजे, दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा सण आहे, फटाके फोडण्यासाठी नाही. आपल्या सर्वांनी फटाके न वापरता शांततापूर्ण वातावरणात दिवाली साजरा करण्याचा संकल्प केला पाहिजे.
प्रदूषणामुळे, सुप्रीम कोर्टाने काही राज्यांमध्ये फटाक्यांच्या वापरावर निर्बंध घातले आहेत किंवा त्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला बरेच लोक धार्मिक रंग देतात,असे दिसते, अशा लोकांना आम्हाला समजावून सांगावे लागेल की लहान निर्णय केवळ मोठे बदल घडवून आणतात. केवळ लोकांपर्यंत जागरूकता आणून आपण फटाके बंदी यशस्वी करू आणि प्रदूषण मुक्त वातावरणात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो.
दिवाळी सणाचा संदेश
दिवाळी हा एक उत्सव आहे जो सर्व धर्माच्या लोकांनी मोठ्या शांतीने आणि अभिमानाने साजरा केला आहे. हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्त्व आहे. या सणानिमित्त आपल्याला भारतीय संस्कृती, भारतीय चालीरिती, भारतीय परंपरा इत्यादींची झलक मिळते.
हा सण आम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो. हा सण आपल्याला शिकवतो की आपण कधीही अंधाराची भीती बाळगू नये कारण एका लहान दिव्याची ज्योत देखील अंधाराला प्रकाशात बदलू शकते. म्हणूनच, जीवनात आपण नेहमीच आशावादी असावे आणि एखाद्याने त्याच्या आयुष्यात नेहमी आनंदी असले पाहिजे.
दीपावलीचा सण हा सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद आणतो, या सणामुळे आजही लोकांमध्ये सामाजिक ऐक्य कायम आहे.
तर हा होता दिवाळी सणावर मराठी निबंध, मला आशा आहे की आपणास दिवाळी सणावर हा मराठी माहिती निबंध (essay on Divali festival in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi
Essay On Diwali In Marathi भारत एक असा देश आहे जिथे नऊपेक्षा जास्त धर्मांचे लोक एकत्र राहतात. हवामान, प्रदेश, धर्म इत्यादींमध्ये खूप भिन्नता आहे, त्यामुळे येथे बरेच सण साजरे होत असतात. त्यांच्यातील बरेच सण असे असतात की ते एखाद्या विशिष्ट धर्माचे असतात, परंतु इतर धर्मातील लोक देखील ते साजरे करतात. यातील एक उत्सव म्हणजे ‘दिवाळी’ ज्याबद्दल आपण खाली वेगवेगळ्या शब्दांत निबंध वाचू शकता.
दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi
दिवाळी वर १० ओळीत मराठी निबंध 10 line on diwali in marathi.
१) दिवाळी हा दिव्यांचा सण आहे.
२) दिवाळी हा भारतात साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव आहे.
३) दिवाळी म्हणजे १४ वर्षांच्या वनवासानंतर भगवान रामला अयोध्येत परत येण्याचा उत्सव.
४) या सणाला आम्ही दिव्यांच्या रोषणाईने आणि रांगोळीने घराची सजावट करीत असतो.
५) दिवाळीच्या दिवशी आम्ही देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतो.
६) मुले फटाके फोडतात आणि आपल्या मित्रांसह आनंद घेतात.
७) आम्ही मिठाई खातो तसेच आमच्या मित्रांना आणि शेजार्यांना भेटवस्तू देत असतो.
८) दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्याकडे शाळेला लांब सुट्ट्या असतात.
९) धनतेरसवर आम्ही दिवाळीची बरीच खरेदीही करतो.
१०) दिवाळी हा सर्वात आवडता सण आहे आणि आम्ही त्याचा खूप आनंद घेतो.
- पावसाळा वर निबंध
दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi { १०० शब्दांत }
भारत हा असा देश आहे ज्याला सणांचा देश म्हणतात. या सणापैकी एक खास सण म्हणजे दिवाळी. दिवाळी या सणाला दीपावली सुद्धा म्हटले जाते. हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दसरा झाल्यावर २० दिवसानंतर येत असतो. भगवान राम यांच्या १४ वर्षे वनवासाच्या स्मरणार्थ आणि त्यांचे राज्यात परत येण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.
दिवाळी म्हणजेच दिव्यांची रोषणाई असलेला उत्सव. अशाच प्रकारे दिव्याच्या ओळींनी सज्ज असलेल्या या सणाला दीपावली म्हणतात. दिवाळीला प्रकाशाचा उत्सव म्हणून देखील ओळखले जाते, जे लक्ष्मीचे घरात आगमन, तसेच वाईट गोष्टींवर विजय मिळविण्याचे लक्षण आहे. भगवान श्री राम यांनी असुरांचा राजा रावणाचा वध करून पृथ्वीला वाईटापासून वाचविले. या सणाला फटाक्याची आतिषबाजी केली जाते.
- सुभाषचंद्र बोस वर निबंध
दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi { २०० शब्दांत }
दिवाळी हा हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण आहे. यात बरेच संस्कार, परंपरा आणि सांस्कृतिक श्रद्धा आहेत. हा उत्सव केवळ देशातच नव्हे तर परदेशातही संपूर्ण उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवाशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. या कथेच्या मागे राक्षस रावणावर भगवान राम यांचा विजय तसेच वाईट गोष्टीवर विजय मिळविण्याचे प्रतीक म्हणून देखील पाहिले जाते. त्या दिवशी कार्तिक महिन्यातील अमावस्या होती. अयोध्यामधील लोकांनी काळोख्या अंधारात दीप प्रज्वलित केले. तेव्हापासून हा दिवस प्रत्येक वर्षी दिवाळी म्हणून साजरा केला जातो.
लक्ष्मीच्या आगमनासाठी आणि जीवनातील सर्व अंधकार दूर करण्यासाठी लोक आपली घरे व मार्ग प्रकाशमय करतात. यावेळी, सर्वजण गोड पदार्थ बनविणे आणि इतर बर्याच कामांमध्ये व्यस्त राहून हा सण साजरा केला जातो. शासकीय कार्यालये सुशोभित आणि स्वच्छ देखील केली जातात.
लोक हा सण आपले नातेवाईक आणि विशेष मंत्रांसह साजरे करतात. यात ते एकमेकांना भेटवस्तू, मिठाई आणि दीपावलीच्या शुभेच्छा देऊन अभिवादन करतात. प्रत्येकजण हा आनंद परमेश्वराची उपासना करून, खेळाद्वारे आणि फटाक्यांद्वारे साजरा करतो. हे सर्वजण आपल्या क्षमतेनुसार आपल्या प्रियजनांसाठी नवीन कपडे खरेदी करतात.
असे मानले जाते की देवी लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून घरांची स्वच्छता आणि दिवे लावून सजावट करणे अत्यंत आवश्यक आहे. हे संपूर्ण भारतभर एकतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. भारत हा सणांचा देश आहे, येथे वेगवेगळे उत्सव वेळोवेळी वेगवेगळे समुदाय साजरे करतात. सर्व सणांपैकी दिवाळीला सर्वात जास्त पसंत करतात.
- महात्मा गांधी वर निबंध
दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi { ३०० शब्दांत }
दिवाळी हा एक महत्वाचा आणि प्रसिद्ध सण आहे जो देश-विदेशात दरवर्षी साजरा केला जातो. चौदा वर्षांच्या वनवासातून भगवान राम यांनी अयोध्येत परतल्यावर आणि लंकेचा राक्षस राजा रावणाला पराभूत केल्यानंतर हा उत्सव साजरा केला जातो.
भगवान राम परत आल्यावर सर्व अयोध्या लोकांनी राम आणि सीता यांच्या स्वागतासाठी संपूर्ण उत्साहाने घरे व मार्ग सजविले. हा पवित्र हिंदू सण आहे जो वाईटावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. जहांगीरने ग्वाल्हेरच्या तुरूंगातून सुटका केली तेव्हा शीखांचे सहावे गुरु श्रीहरगोविंद जी यांच्या सुटकेच्या आनंदातही हा साजरा केला जातो.
दीपावली का साजरी केली जाते?
हा उत्सव कार्तिक महिन्यात अमावास्येच्या दिवशी साजरा केला जातो. अमावस्येच्या दिवशी ही एक अतिशय गडद रात्र असते आणि हि रात्र प्रकाशमय करण्यासाठी दिव्यांची सजावट करून घरे सजविली जाते. या उत्सवाबद्दल अनेक कथा आहेत, परंतु असे म्हटले जाते की भगवान राम चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले, या आनंदात अयोध्या लोकांनी दीप प्रज्वलन करून त्यांचे स्वागत केले.
बाजाराला वधूसारखे सुंदर सजावट केले जाते. या दिवशी बाजारपेठेत विशेष गर्दी असते, विशेषत: मिठाईच्या दुकानांवर, मुलांसाठी जणू हा दिवस नवीन कपडे, खेळणी, फटाके आणि भेटवस्तू घेऊन येतो. दिवाळीचे आगमन होण्याआधी काही दिवसांपूर्वी लोक आपल्या घरांची साफ-सफाई करतात.
दिवाळी सणाची तयारी
दिवाळीच्या दिवशी प्रत्येकजण खूप आनंदी असतो आणि एकमेकांना शुभेच्छा देतो. दिवाळीच्या काही दिवस आधी मुले खेळणी व फटाके विकत घेतात, घराची साफसफाई सुरू होते. लोक त्यांचे घर सजवतात. लोक या निमित्ताने नवीन कपडे, भांडी, मिठाई इत्यादी खरेदी करतात.
लक्ष्मी देवीच्या पूजेनंतर फटाक्यांची आतिषबाजी सुरू होते. या दिवशी लोक वाईट सवयी सोडतात आणि चांगल्या सवयींचा अवलंब करतात. भारतातील काही ठिकाणी दिवाळी नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते, त्याचप्रमाणे व्यवसायातील लोक त्यांच्या नवीन खात्यासह सुरुवात करतात.
तात्पर्य
हिंदूंनी साजरा केलेला सर्वात मोठा उत्सव म्हणजे दिवाळी. दीपोत्सवाच्या विशेष उत्सवामुळे त्यास दीपावली किंवा दिवाळी असे नाव पडले. कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी साजरा होणारा हा महान उत्सव रात्रीच्या अंधारात असंख्य दिव्याच्या प्रकाशाने प्रकाशतो. दिवाळी हा प्रत्येकासाठी एक खास सण आहे कारण तो लोकांसाठी आनंद घेऊन येतो.
- माझे आवडते शिक्षक
दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi { ४०० शब्दांत }
हिंदूंसाठी दिवाळी हा एक वार्षिक सण आहे जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात येत असतो. या उत्सवामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धा आहेत. हा उत्सव साजरा करण्यामागील एक खास बाब म्हणजे राक्षस राजा रावणचा पराभव करून भगवान राम यांनी १४ वर्षे वनवास सोसून अयोध्येत पोहोचले. हे पावसाळ्याच्या प्रस्थानानंतर हिवाळ्यातील आगमन सूचित करते.
हे व्यापाऱ्यांसाठी नवीन सुरुवात देखील दर्शवते. दिवाळीनिमित्त लोक त्यांच्या प्रियजनांना मिठाई, काजू, केक इत्यादी शुभेच्छा देऊन भेटवस्तू वाटप करतात. लोक त्यांच्या सुवर्ण भविष्य आणि भरभराटीसाठी लक्ष्मीदेवीची पूजा करतात.
वाईटापासून बचाव करण्यासाठी सर्वत्र दिवे पेटविले जातात आणि देवी-देवतांचे स्वागत केले जाते. दीपावली उत्सवाच्या आगमनाच्या महिन्याआधीच लोक वस्तू खरेदी करण्यात, घराची साफसफाई करण्यात व्यस्त असतात. दिव्याचा प्रकाश चमकदार असतो आणि आश्चर्यकारक सौंदर्य सर्वत्र पसरलेले असते.
मुलांची दिवाळी
हा सण साजरा करण्यासाठी, मुले अत्यंत उत्साही असतात आणि त्याशी संबंधित प्रत्येक क्रियाकलापात भाग घेतात. शाळेत हा सण शिक्षक मुलांना कथा सांगून, रांगोळी बनवून, त्यांना खाऊ घालून साजरा करतात. दिवाळीच्या दोन आठवड्यांपूर्वी शाळेत मुले अनेक उपक्रम सुरू करतात. शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांना फटाके तसेच दिवाळीशी संबंधित उपासना पद्धती आणि चालीरितीविषयी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात.
दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे जो संपूर्ण आनंद आणि उत्साहाने लोक साजरा करतात. दिवाळीच्या पहिल्या दिवसाला धनतेरस, दुसरे छोटी दिवाळी, तिसर्याला दिवाळी किंवा लक्ष्मी पूजा, चौथे गोवर्धन पूजा आणि पाचव्याला भाऊबीज असे म्हणतात. दिवाळीच्या या पाच दिवसांची स्वतःची धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धा आहे.
परंपरा
अंधारावर प्रकाशाचा विजय लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी आणतो. हा एक अतिशय महत्वाचा उत्सव आहे जो वैयक्तिक आणि एकत्रितपणे साजरा केला जातो. प्रत्येक प्रांत किंवा प्रदेशात दिवाळी साजरी करण्याची पद्धत आणि कारण भिन्न आहे, हा सण सर्वत्र पिढ्यान-पिढ्या चालू आहे. लोकांमध्ये दिवाळीबद्दल खूप उत्साह आहे.
लोक त्यांच्या घराचे कोपरे स्वच्छ करतात, नवीन कपडे परिधान करतात. लोक एकमेकांना मिठाई आणि भेटवस्तू देतात, एकमेकांना भेटतात. रंगीबेरंगी रांगोळी घरात तयार केल्या जातात. दिवे पेटवले जातात, फटाके फोडले जातात. काळोखांवर प्रकाश मिळवण्याचा हा उत्सव समाजात चैतन्य, बंधुता आणि प्रेमाचा संदेश पोहोचवितो.
फटाके वडिलांच्या देखरेखीखाली फोडले पाहिजेत कारण कोणत्याही मूर्खपणामुळे अपघात आणि आगीचा धोका उद्भवू शकतो. आवश्यकतेच्या वेळी मदतीसाठी अनेक ठिकाणी अग्निशामक निविदा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या जातात. आनंदी प्रसंगी भाग घेणार्या सर्व तरुण आणि वृद्धांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जेणेकरून अशा हानी होऊ नयेत.
हा उत्सव सलग पाच दिवस साजरा केला जातो, तो धनतेरसपासून सुरू होतो आणि भाऊबीज पर्यंत टिकतो. धनतेरसच्या दिवशी श्रीमंतीचे देवता कुबेर यांची पूजा केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. खरं तर हा उत्सव आपल्या मनाला उजळवून टाकण्याचा संदेश देतो. हा उत्सव देशाच्या कानाकोपऱ्यात बहुसंख्य भारतीय साजरा करतात. तसेच ते विविधतेतील एकतेचे प्रतिक बनले आहे.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- गाय वर निबंध
- पर्यावरण वर निबंध
- माझी शाळा वर निबंध
दिवाळीला दिव्यांचा सण का म्हणतात?
या सणाला हे नाव मातीच्या दिव्यांच्या रांगेतून (अवली) मिळाले (दीपा) जे भारतीय लोक त्यांच्या घराबाहेर प्रकाश करतात ते आंतरिक प्रकाशाचे प्रतीक आहे जे आध्यात्मिक अंधारापासून संरक्षण करते .
दिवाळीला काय म्हणतात?
दिवाळी, ज्याला दीपावली असेही म्हणतात, हा हिंदू, जैन, शीख आणि काही बौद्ध लोकांद्वारे साजरा केला जाणारा पाच दिवसांचा सण आहे. हे ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शरद ऋतूमध्ये होते, दरवर्षी तारीख बदलते.
दिवाळीत दिवे का लावले जातात?
दिवे लावणे ही एक महत्त्वाची हिंदू परंपरा आहे आणि ती शुभ मानली जाते कारण हे मातीचे दिवे वाईट आत्मा किंवा नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी आणि दयाळूपणा आणि शुद्धतेचे प्रतीक आहेत.
भारतीय संस्कृतीत दिवाळीचे महत्त्व काय आहे?
दिवाळी अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा आध्यात्मिक विजयाचे प्रतीक आहे . दिवाळीचे दिवे आपल्या सर्व काळ्या इच्छा आणि विचारांचा नाश करण्याची, काळ्या सावल्या आणि वाईट गोष्टी नष्ट करण्याची वेळ दर्शवतात आणि उर्वरित वर्षभर आपल्या सदिच्छा सोबत ठेवण्याची शक्ती आणि उत्साह देतात.
Leave a Comment
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Essay On Diwali | दिवाळी निबंध मराठी, हिन्दी, इंग्रजी
Post By : MarathiVedaTeam
Post Last Updated On :
October 26, 2024
हिन्दी निबंध , मराठी निबंध
Essay On Diwali | दिवाळी निबंध मराठी, हिन्दी, इंग्रजी : ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला तीन भाषांमध्ये निबंद वाचायला मिळेल. तरी शेवटी ही पोस्ट वाचून तुमच्या प्रतिक्रिया कोंमेंट्स मध्ये लिहा.
Table of Contents
दिवाळी निबंध मराठी | Diwali Nibandh Marathi | Diwali Essay in Marathi
Essay On Diwali : दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली.
ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. (Essay On Diwali) नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.
धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.
नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा (Essay On Diwali) हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे.
अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. (Essay On Diwali) व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो.
पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो. (Essay On Diwali)
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- दिवाळीच्या शुभेच्या | Diwali Wishes In Marathi
- दिवाळीची संपूर्ण माहिती | Diwali Information 2023 Marathi
- धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती | Dhanteras Information In Marathi
- धनत्रयोदशीच्या शुभेच्छा | Dhantrayodashi Wishes In Marathi
- वसुबारस निमित्त शुभेच्या | Vasubaras Wishes In Marathi
- लक्ष्मी पूजन शुभेच्छा | Laxmi Pujan Diwali Wishes In Marathi
- भाऊबीज शुभेच्छा | Bhaubeej Wishes In Marathi
- नरकचतुर्दशी शुभेच्या, माहिती | Narak Chaturdashi Wishes, Info
दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छापत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी. सुखद दिपावलीच्या अनेक सुखद आठवणींपुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात.
दीपावली पर निबंध हिंदी में | Hindi Essay On Diwali
Essay On Diwali : दीपावली का त्योहार पांच दिनों तक चलने वाला सबसे बड़ा पर्व होता है। दशहरे के बाद से ही घरों में दीपावली की तैयारियां शुरू हो जाती है, जो व्यापक स्तर पर की जाती है। इस दिन भगवान श्रीराम, माता सीता और भ्राता लक्ष्मण के साथ चौदह वर्ष का वनवास पूर्ण कर अयोध्या लौटे थे। इसके अलावा दीपावली को लेकर कुछ और भी पौराणिक कथाएं प्रचलित हैं।
प्रस्तावना – प्रत्येक समाज त्योहारों के माध्यम से अपनी खुशी एक साथ प्रकट करता है। हिन्दुओं के प्रमुख त्योहार होली, रक्षाबंधन, दशहरा और दीपावली हैं। इनमें से दीपावली सबसे प्रमुख त्योहार है। इस त्योहार का ध्यान आते ही मन-मयूर नाच उठता है। यह त्योहार दीपों का पर्व होने से हम सभी का मन आलोकित करता है।
दीपावली मनाई जाती है – यह त्योहार कार्तिक माह की अमावस्या के दिन मनाया जाता है। अमावस्या की अंधेरी रात जगमग असंख्य दीपों से जगमगाने लगती है। कहते हैं भगवान राम 14 वर्ष के वनवास के बाद अयोध्या लौटे थे, इस खुशी में अयोध्यावासियों ने दीये जलाकर उनका स्वागत किया था। श्रीकृष्ण ने नरकासुर नामक राक्षस का वध भी इसी दिन किया था। यह दिन भगवान महावीर स्वामी का निर्वाण दिवस भी है। इन सभी कारणों से हम दीपावली का त्योहार मनाते हैं।
दीपोत्सव मनाने की तैयारियां – यह त्योहार लगभग सभी धर्म के लोग मनाते हैं। इस त्योहार के आने के कई दिन पहले से ही घरों की लिपाई-पुताई, सजावट प्रारंभ हो जाती है। नए कपड़े बनवाए जाते हैं, मिठाइयां बनाई जाती हैं। वर्षा के बाद की गंदगी भव्य आकर्षण, सफाई और स्वच्छता में बदल जाती है। लक्ष्मी जी के आगमन में चमक-दमक की जाती है।
उत्सव – यह त्योहार पांच दिनों तक मनाया जाता है। धनतेरस से भाई दूज तक यह त्योहार चलता है। धनतेरस के दिन व्यापार अपने बहीखाते नए बनाते हैं। अगले दिन नरक चौदस के दिन सूर्योदय से पूर्व स्नान करना अच्छा माना जाता है। अमावस्या के दिन लक्ष्मीजी की पूजा की जाती है। ( Essay On Diwali )
खील-बताशे का प्रसाद चढ़ाया जाता है। नए कपड़े पहने जाते हैं। फुलझड़ी, पटाखे छोड़े जाते हैं। असंख्य दीपों की रंग-बिरंगी रोशनियां मन को मोह लेती हैं। दुकानों, बाजारों और घरों की सजावट दर्शनीय रहती है। अगला दिन परस्पर भेंट का दिन होता है। एक-दूसरे के गले लगकर दीपावली की शुभकामनाएं दी जाती हैं। गृहिणियां मेहमानों का स्वागत करती हैं। लोग छोटे-बड़े, अमीर-गरीब का भेद भूलकर आपस में मिल-जुलकर यह त्योहार मनाते हैं।
Essay On Diwali Festival | दिवाळी निबंध इंग्रजी मध्ये
Essay On Diwali : Diwali, a festival of light is the most popular festival in India which symbolizes the spiritual “victory of good over evil, light over darkness, and knowledge over ignorance”. This year Diwali is going to be celebrated from 10th November to 15th November 2023. Diwali is an important religious festival originating all across India. Most people think of Diwali as a Hindu festival, but it is also celebrated by Sikhs and Jains with the same enthusiasm and happiness. In India, people celebrate the story of King Rama’s return to Ayodhya after defeating Ravana. People celebrate Diwali by lighting rows of clay lamps, Lakshmi puja, firecrackers festivities, and distributing sweets.
Essay On Diwali :
A “festival of lights,” Diwali (also known as Divali or Deepavali) honours the blessings of victory, freedom, enlightenment, and the triumph of light over darkness and good over evil. The word “row of lights” (Sanksrit Deepavali) is where the name originates. Diwali celebrants burn a large number of candles and clay lamps, or diyas, and scatter them throughout their homes and along the streets to illuminate the gloomy night.
The main Diwali celebration takes place on the third day of a five-day festival throughout the majority of India. Only the main day is often observed in other locations where Diwali is observed.
Diwali is observed by a large number of people globally. Thus, customs vary, but there are some commonalities, such as candle lighting and family gatherings. Since the primary Diwali celebration occurs on the new Moon’s day when the sky is the darkest and a significant portion of the celebration centres on the light. In the home, streets, places of worship, and even floating down lakes and rivers, candles, clay lamps, and oil lanterns are lit. On the night of Diwali, fireworks are also lit off, with some believing this wards off evil spirits. The meal can be rather lavish, with a table covered in speciality foods and desserts.
The Hindu calendar’s first day of the new year in India is observed on Diwali. The fourteen-year exile of Lord Ram is commemorated on this holiday. He also overcame Ravana, the ten-headed king who had kidnapped his wife, Sita, at this time. In the Ramayana, an old epic about Ram, Sita, and morality, other significant characters include Hanuman (the Monkey God) and Laxman (Ram’s younger brother).
Regardless of how it is observed, Diwali or Deepavali is a national holiday that celebrates joy, happiness, and brotherhood. Families gather to celebrate one another’s health during this time.
Even though the festival’s structure and style of celebration have changed, it will be encouraging to see youth initiatives use this day to integrate all communities further and invite everyone to take part in the celebrations. When other groups observe their own festivals, the same must be reciprocated. India will then be able to really claim the spirit of inclusivity and secularism.
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
Raksha Bandhan Nibhand | रक्षाबंधन मराठी निबंध
टपाल दिन | Tapal Din | World Post Day Essay In Marathi
Janmashtami Dahi Handi Essay | जन्माष्टमी, दही हांडी निबंध
Leave a comment cancel reply.
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
- Marathi News
- career news
- Essay On Diwali In Marathi Nibandh On Dipawali For Students Festival Of Lights
Diwali Essay In Marathi: दिव्यांचा सण असणाऱ्या 'दिवाळी'वर निंबध लिहताय? तर हे वाचा, दिपावलीचा इतिहास आणि माहिती
Essay on diwali in marathi: दिवाळी हा सण देशभर अगदी उत्साहात साजरा केल जातो. याकाळात सर्व कुटुंब एकत्र येऊन गोडधोड पदार्थ केले जातात. तसेच दिवाळीची विविध दिवस सण साजरे केले जातात. लहान मुलांचीही या काळात चांगलीच चंगळ असते. शाळांना सुट्टी, घरी मस्त गोडधोड पदार्थ आणि फटाके. हा सण हिंदु धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. जाणून घेऊया अधिक....
दिवाळी २०२४-
पहिल्यांदा आपण दिवाळीतील विविध दिवस पाहूयात-
दिवाळी सणावर १०० शब्दांमध्ये निबंध-
दिवाळी हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. याला दिव्यांचा सण असेही म्हणतात. या दिवशी प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी दिवे लावले जातात. लोक आपली घरे स्वच्छ करतात, सजवतात आणि रात्री दिवे लावतात. मिठाई वाटून फटाके फोडले जातात. लक्ष्मीपूजनाने सुख-समृद्धीची कामना केली जाते. हा सण सर्वांना एकतेचा आणि आनंदाचा संदेश देतो. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने केला जातो.
दिवाळी सणावर ३०० शब्दांमध्ये निबंध
दिवाळी हा हिंदूंचा सर्वात महत्वाचा सण आहे, ज्याला दिव्यांचा सण म्हणतात. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. १४ वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परतल्याबद्दल हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी लोक आपली घरे आणि कार्यालये स्वच्छ करतात आणि रांगोळी काढतात. संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि दिवे लावून घरे उजळून निघतात. मिठाई वाटून आतषबाजीही केली जाते. दिवाळीच्या दिवशी लोक एकमेकांना मिठाई आणि भेटवस्तू देतात. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. यासोबतच लोक देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि समृद्धी आणि आनंदाची कामना करतात. दिवाळीचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-शांती घेऊन येवो, अशा शुभेच्छा दिल्या जातात. दिवाळीशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. त्यातील सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे रामाची. १४ वर्षांच्या वनवासानंतर जेव्हा प्रभू राम अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी आपली घरे दिव्यांनी सजवली आणि संपूर्ण शहर आनंदाने उजळून निघाले. या दिवसाच्या मुख्य धार्मिक कार्यांमध्ये देवी लक्ष्मीची पूजा समाविष्ट आहे, ज्याला संपत्ती आणि समृद्धीची देवी मानले जाते. दिवाळीचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वही खूप मोठे आहे. लोक एकमेकांना मिठाई आणि भेटवस्तू देतात, त्यांचे घर स्वच्छ करतात आणि त्यांना सजवतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण फटाके फोडण्याचा आनंद घेतात. मात्र, आता पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकांना फटाके टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या सणाला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण बंधुभाव, एकता आणि आनंदाचा संदेशही दिला जातो. सर्व धर्म आणि जातीचे लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात, ज्यामुळे विविधतेतील एकतेची आपली परंपरा अधिक दृढ होते.
लेखकाबद्दल प्रमोद सरवळे सध्या महाराष्ट्र टाईम्समध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. महाराष्ट्रातील विविध भागात काम केल्याने राज्यातील राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक बाबींचा चांगला अभ्यास. यापूर्वी सकाळ, लोकमत माध्यम समुहात काम केले. शैक्षणिक, व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यवहार विषयांची उत्तम जाण. डिजिटल माध्यमांत काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर लिखाण केले. विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. उत्तम फिचर रायटर. ... आणखी वाचा
मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? फडणवीस तिसऱ्या नंबरवर, शरद पवारांना दादांहून अधिक मतं, टॉपवर कोण?
आता यापूढे जेव्हा मी काम करेन तेव्हा... म्हणत नि:शब्द झाली मुक्ता बर्वे, संजय मोने यांनी व्यक्त केली 'ती' एकच इच्छा; मराठी कलाकार झाले भावुक
एक पंगा अन् झाला दंगा! एकाच महिन्यात शेअरची विक्रमी आपटी, गुंतवणूकदार टेन्शनमध्ये, पुढे काय होणार?
सर्वात शक्तिशाली अँड्रॉइडची बाजारात एंट्री! दणकट प्रोसेसरसह Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro लाँच
LIVE Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
बायको दिव्यांग झाल्यावर नवऱ्याचा पळ, स्थानिक नेत्यांचा मदतीसाठी फक्त बडेजाव, महेश टिळेकरांनी अशी केली मदत
पाण्यानं भरलेल्या खोलीत अडकला आहात, वाचवण्यासाठी दोरी स्ट्रॉ आणि बादली आहे, तुम्ही आपला जीव कसा वाचवाल?
महत्वाचे लेख.
आता शासकीय नोकरीच्या परीक्षेनंतर पदवी परीक्षेतही डमी विद्यार्थी, मुंबईतील प्रकार; दोघांविरोधात गुन्हा दाखल
GK in Marathi: स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणाऱ्या 'या' प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहित आहेत का?
History GK in Marathi: स्पर्धा परीक्षांतील इतिहासाशी संबंधित 'या' प्रश्नाची उत्तरे तुम्हाला माहित आहेत का?
RITES Recruitment: भारतीय रेल्वे तांत्रिक आणि आर्थिक सेवा संस्थेत विविध पदांसाठी भरती, मुलाखतीतून होणार निवड
NIV Recruitment 2024: पुण्यातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी' संस्थेत विविध पदांसाठी भरती; 'असा' करा अर्ज
HAL Recruitment 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स विविध पदांसाठी भरती सुरु; लाखांमध्ये पगार, ४ नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज
1. Happy Diwali Essay in Marathi / दिवाळी निबंध मराठी(३०० शब्दात)
Diwali Essay in Marathi – हिंदू calendar नुसार, दिवाळी कार्तिक महिन्यात अमावस्या (अमावस्या) रोजी येते. हिंदू धर्मातील हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, नवीन घरात स्थलांतर करण्यासाठी किंवा कार, दुकान, दागदागिने इत्यादी खरेदी करण्यासाठी लोक वर्षातील या वेळेची प्रतीक्षा करतात. या सणाच्या उत्सवाशी अनेक पौराणिक कथा जोडल्या जातात. भारतातील विविध प्रदेशातील लोक वेगवेगळ्या कारणांसाठी तो साजरा करतात. तथापि, सर्वत्र भव्य उत्सवाचे आवाहन केले जाते.
दिवाळी हा प्रभू रामचंद्रांचा सन्मान करण्याचा सण आहे. कारण फार पूर्वी भगवान राम १४ वर्षे दूर राहून अयोध्या नगरी परत आले होते. तो दूर असताना, त्याला काही वाईट प्राण्यांशी आणि लंका नावाच्या ठिकाणी राज्य करणाऱ्या रावण नावाच्या बलवान राजाशी लढावे लागले. जेव्हा राम परत आला तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांना पाहून किती आनंद झाला हे दाखवण्यासाठी आणि तो जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी तेलाचे दिवे लावले. दरवर्षी दसऱ्याला भारतभर रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. हे वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. वीस दिवसांनी दिवाळी येते. दिवाळी साजरी करण्यासाठी घरे आणि बाजारपेठा सुंदर दिव्यांनी आणि दिव्यांनी उजळून निघतात. या ठिकाणांचे सौंदर्य वाढवण्यासाठी रांगोळ्या काढल्या जातात, तसेच सजावटीच्या वस्तूंचा वापर केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी लोक आपली घरे पूर्णपणे स्वच्छ करून सजवतात. असे मानले जाते की देवी लक्ष्मी, धनाची देवी, केवळ स्वच्छ आणि सुंदर असलेल्या ठिकाणी भेट देते.
दिवाळीच्या उत्सवाचा एक भाग म्हणून लोक एकमेकांना भेट देतात आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. अनेक लोक या दिवशी घरोघरी पार्ट्यांचे आयोजन करतात. आपल्या नातेवाईक आणि मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी हा उत्तम काळ आहे. अनेक कार्यालये आणि निवासी सोसायट्या सणाच्या एक-दोन दिवस आधी दिवाळी पार्टी आयोजित करतात. विशेषत: या दिवशी मुले फटाके वाजवण्यास उत्सुक असतात. ते आजूबाजूला जमतात आणि वेगवेगळे फटाके पेटवून उत्सवात आनंद साजरा करतात.
स्वच्छता आणि सजावट
दिवाळीच्या सणाची सुरुवात घर आणि कामाच्या ठिकाणी साफसफाईने होते. पडदे धुण्यापासून ते पंखे साफ करण्यापर्यंत, घराचा प्रत्येक कोपरा साफ करण्यापासून ते निरुपयोगी जुने सामान टाकून देण्यापर्यंत – दिवाळी म्हणजे घरांची तसेच कामाची ठिकाणे पूर्णपणे स्वच्छ करण्याची वेळ असते. अनेक सफाई संस्था दिवाळीच्या आसपास विशेष सवलती देतात आणि चांगला व्यवसाय करतात. लोक त्यांची ठिकाणे पुन्हा सजवण्यासाठी घराच्या सजावटीच्या विविध वस्तू खरेदी करतात. घरे दिवे, कंदील, मेणबत्त्या, फुले आणि इतर अनेक सजावटीच्या वस्तूंनी सजवले जातात.
वरील निबंध Diwali Essay in Marathi – ३०० शब्दांचा आहे अधिक माहितीसाठी खालील माहितीं वाचा.
आनंद शेअर करणे
लोक त्यांचे नातेवाईक, शेजारी आणि मित्रांना भेट देतात. ते भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि एकमेकांसोबत वेळ घालवतात. बरेच लोक आपल्या प्रियजनांसोबत सण साजरा करण्यासाठी दिवाळी पार्ट्यांचे आयोजन करतात. अशा प्रकारे उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो. अनेक रहिवासी सोसायट्या दिवाळी पार्ट्यांचे आयोजन करतात. उत्सवात आनंद साजरा करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
देवी लक्ष्मीचा जन्म
कार्तिक महिन्यातील अमावास्येला देवी लक्ष्मीचा जन्म झाला असे म्हणतात. अशा प्रकारे, काही प्रदेशांमध्ये, देवी लक्ष्मीच्या जन्माचा आनंद घेण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते, ज्याची या दिवशी संध्याकाळच्या वेळी पूजा केली जाते. देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे आणि हिंदू तिच्याबद्दल खूप आदर करतात. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा करण्याचा विधी प्रत्येक हिंदू घरात पाळला जातो , ह्या परिच्छेदात Diwali Essay in Marathi दिवाळी कशी साजरी करतात ते लिहिले आहे. कारण काहीही असो, दिवाळी संपूर्ण भारतात तसेच इतर काही देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. घराची साफसफाई करणे, नवीन कपडे, मिठाई आणि भेटवस्तू खरेदी करणे, घर सजवणे, दिवे लावणे, प्रार्थना करणे, फटाके वाजवणे आणि प्रियजनांना भेटणे हे काही विधी दिवाळीत केले जातात.
दिवाळीत प्रदूषण : Diwali Essay in Marathi
दिवाळीच्या सणाबरोबरच या सणादरम्यान विविध प्रकारचे फटाके फोडल्यामुळे जगभरात पर्यावरण प्रदूषणात अप्रत्यक्षपणे वाढ होत आहे. असे फटाके अतिशय धोकादायक असतात कारण ते Sulphur dioxide, carbon monoxide इत्यादी विषारी प्रदूषक सोडतात, जे हवेत मिसळतात आणि दमा, Bronchitis, उच्च रक्तदाब इत्यादीसारख्या विविध आजारांना कारणीभूत ठरतात. याचा सर्व वयोगटातील लोकांवर परिणाम होतो; तथापि, जे आधीच कोणत्याही आजाराने ग्रस्त आहेत. वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे मानवांबरोबरच प्राणी, पक्षी आणि इतर सजीवांच्या जीवनावरही याचा परिणाम होतो.
फटाक्यांशिवाय कुटुंबासह दिवाळी साजरी : Diwali Essay in Marathi
दिवाळी हा वर्षातील माझा आवडता सण आहे आणि मी माझ्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत खूप उत्साहाने तो साजरा करतो. दिवाळीला दिव्यांचा सण म्हटले जाते कारण आपण तो खूप दिवे आणि मेणबत्त्या पेटवून साजरा करतो. हा एक पारंपारिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे जो संपूर्ण भारत आणि परदेशातील प्रत्येक हिंदू व्यक्तीद्वारे साजरा केला जातो. लोक त्यांची घरे पुष्कळ मेणबत्त्या आणि लहान चिकणमातीच्या तेलाच्या दिव्यांनी सजवतात, जे वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतात.
कौटुंबिक सदस्य दिवसाचा बराचसा वेळ घराची तयारी करण्यात घालवतात (स्वच्छता, सजावट इ.) उत्सवाचे स्वागत संध्याकाळच्या भव्य पार्टीसह. शेजारी, कुटुंबातील सदस्य आणि मित्र संध्याकाळच्या पार्टीत एकत्र येतात आणि रात्रभर स्वादिष्ट भारतीय पदार्थ, नृत्य, संगीत इत्यादीसह पार्टीचा आनंद घेतात. व्हाईट वॉश, मेणबत्तीचे दिवे आणि रांगोळ्यांमध्ये घरे अतिशय आकर्षक दिसतात. उच्च-पिच संगीत आणि फटाके उत्सव अधिक मनोरंजक बनवतात, ह्या परिच्छेदात Diwali Essay in Marathi दिवाळीत काय काय केले जाते ते लिहिले आहे.
लोक त्यांच्या नोकरी, कार्यालये आणि इतर काम उरकून त्यांच्या घरी जातात; दिवाळीच्या सणाला आपल्या घरी सहज जाण्यासाठी विद्यार्थ्यांनीही तीन महिन्यांपूर्वी आपली ट्रेन बुक केली कारण प्रत्येकाला हा सण आपल्या गावी आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करायचा असतो. लोक मेजवानी देऊन, फटाके फोडून आणि कुटुंब आणि मित्रांसह नृत्याचा आनंद घेत उत्सवाचा आनंद घेतात.
तथापि, डॉक्टरांनी बाहेर पडून फटाक्यांचा आनंद घेण्यास मनाई केली आहे, विशेषत: फुफ्फुसाचे किंवा हृदयाचे आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादींनी ग्रस्त असलेल्या लोकांना. अशा लोकांना डॉक्टरांचा दरवाजा ठोठावावा लागतो कारण जास्त प्रमाणात संतृप्त अन्न आणि मिठाई खाणे, कमी व्यायाम आणि आजकाल फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण.
इको-फ्रेंडली दिवाळी: एक चांगली कल्पना : Diwali Essay in Marathi
आपण पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली पाहिजे. आपण फटाक्यांना नाही म्हणले पाहिजे आणि आपल्या सभोवतालच्या लोकांनाही तसे करण्याचा सल्ला दिला पाहिजे. फटाके जाळण्याच्या नकारात्मक परिणामांबद्दल आपल्या मुलांना सांगण्याची जबाबदारी पालकांनी घेतली पाहिजे. मुलांनाही शाळांमध्ये याविषयी जागरूक केले पाहिजे. त्यामुळे दिवाळीत फटाके कमी होण्यास मदत होणार आहे, ह्या परिच्छेदात Diwali Essay in Marathi दिवाळी पर्यवानपूरक कशी साजरी करावी ते लिहिले आहे.
लोक त्यांच्या शेवटी काय उपाय करू शकतात याशिवाय, फटाक्यांची विक्री तपासणे महत्वाचे आहे. त्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा. फटाक्यांच्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी घालायला हवी किंवा त्यावर काही निर्बंध घालायला हवेत.
दिपावलीवर एक कविता : Diwali Essay in Marathi
लोपला अंधार सारा, माखली तेजात नगरी उजळले सारेच रस्ते, वाहती आनंदलहरी
लागले लाखो दिवेही, जाळण्या काळोख सारा धुंद तो आला सुगंध, कुठुनसा घेऊन वारा
शोभतो आकाशकंदिल, टांगला उंचावरी टाकला दारी सडाही, बांधले तोरण दारी
होई ते अभ्यंगस्नान, लावुनी उटने सुगंधी तप्त ते पाणी पहाटे, चढविते न्यारीच धुंदी
बोचरी थंडी गुलाबी, फुलविते रोमांच अंगी रांगोळी दारामधे ती, रंगुनी साऱ्याच रंगी
रोषणाई हा खरोखर, प्राण या दिपोत्सवाचा शुभशकुनी सोनकिरणे, नाश करिती दानवांचा
चाहती आबालवृद्ध, गोड खाऱ्या त्या फराळा वाढवी गोडी सणाची, मित्र नि आप्तांचा मेळा
काय मी वर्णु दिवाळी, सोहळा परमोच्च आहे मानवाच्या संगतीने, देवसुद्धा वाट पाहे
जे भुकेले भोवताली, पोरके असती किती वाटुया आनंद त्यांना, एवढी तुम्हा विनंती.
दिवाळी 10 ओळी निबंध – Diwali essay in marathi 10 lines
- दिवाळी हा भारतातील सर्वात प्रसिद्ध सणांपैकी एक आहे, जो त्याच्या आनंद आणि वैभवासाठी ओळखला जातो.
- दिव्यांचा सण असेही म्हणतात, दिवाळी अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवते.
- कुटुंबे आपली घरे स्वच्छ करून आणि दिवे आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजवून दिवाळीची तयारी करतात.
- तेलाचे दिवे किंवा ‘दिये’ लावणे ही एक पारंपारिक प्रथा आहे जी धनाची देवी लक्ष्मीला सन्मानित करते.
- समृद्धी आणि यशासाठी आशीर्वाद घेण्यासाठी लोक प्रार्थना करतात, ज्याला ‘लक्ष्मी पूजा’ म्हणून ओळखले जाते.
- ध्वनीमुक्त आणि पर्यावरणपूरक फटाक्यांवर भर दिला जात असला तरी दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी फटाके फोडले जातात.
- सणासुदीचे जेवण आणि भेटवस्तू आणि मिठाईची देवाणघेवाण करणे कुटुंब आणि मित्रांमधील बंध मजबूत करतात.
- नवीन कपडे घालणे हा उत्सवाचा एक भाग आहे, जो नवीन सुरुवात आणि उत्सवाच्या आनंदी मूडचे प्रतीक आहे.
- दिवाळी चॅरिटेबल कृत्यांना प्रोत्साहन देते, लोकांना त्यांचे नशीब गरजूंसोबत शेअर करण्याची आठवण करून देते.
- एकंदरीत, दिवाळी हा आनंदाचा काळ आहे, प्रियजनांसोबत साजरी केली जाते आणि मजा, मेजवानी आणि आशादायक सुरुवात केली जाते.
- दिवाळीला दिव्यांचा सण म्हणूनही ओळखले जाते.
- दिवाळी हा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
- दिवाळी च्या सणाला दिवे लाऊन प्रार्थना केली जाते.
- भारतासह हा सण जगभरात राहणारे भारतीय देखील साजरा करतात.
- आम्ही दिवाळीच्या दिवशी आमची घरे रंगीबेरंगी रांगोळ्या, झेंडूच्या माळा आणि अनेक दिव्यांनी सजवतो.
- दिवाळी येण्याआधी घराची व दुकानाची स्वच्छता केली जाते.
- या दिवशी स्वादिष्ट मिठाई आणि इतर छान छान पदार्थ बनवले जातात.
- दरवर्षी दिवाळी ला माझे आई वडील मला नवीन कपडे घेऊन देतात.
- या दिवशी आम्ही मित्र आणि नातेवाईक मंडळींना मिठाई देतो.
- दिवाळी च्या सणाला कोणीही दुखी राहू नये म्हणून माझे वडील दरवर्षी गरिबांना मिठाई आणि गिफ्ट देत असतात.
तर मित्रांनो कसा वाटला Diwali Essay in Marathi निबंध आवडला असेल तर जरूर कॉमेंट करा.
For More information Click here : रक्षाबंधन मराठी निबंध
For More information on essay on Diwali in English Click here : Link
Thank You for your valuable time…!
3 thoughts on “1. happy diwali essay in marathi / दिवाळी निबंध मराठी(३०० शब्दात)”.
- Pingback: Maza Avadta Chand Essay in Marathi
- Pingback: निबंध : मकर संक्रात : Makar sankranti essay in marathi
- Pingback: निबंध : ईद(500 शब्दात)Happy Eid : Essay on eid in marathi - joymarathi
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
दिवाळी निबंध 10 ओळी | Diwali Essay in Marathi 10 Lines
नमस्कार मित्रांनो. या लेखात आम्ही दिवाळी निबंध 10 ओळी मध्ये लिहिला आहे. अगदी इंग्रजी माध्यमासाठीही, Diwali Essay in Marathi 10 Lines मध्ये विचारला जाऊ शकतो.
दिवाळी निबंध 10 ओळी – संच १
- दिवाळी हा भारतात साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे.
- वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयामध्ये त्याचे सांस्कृतिक महत्त्व आहे.
- दिवाळीत दिव्यांची रोषणाई म्हणजे नकारात्मकता दूर करणे आणि सकारात्मक ऊर्जेची सुरुवात होय.
- या सणामध्ये घराची बारकाईने साफसफाई करणे आणि नवीन वस्त्रे परिधान करणे यांचा समावेश होतो, या दोन्ही गोष्टी सौभाग्य आणि समृद्धी आकर्षित करतात असे मानले जाते.
- दिवाळीचा स्वयंपाकाचा पैलू तितकाच आनंददायी आहे, ज्यामध्ये स्वादिष्ट मिठाई आणि फराळांचा भरपूर समावेश आहे.
- दिवाळीत भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी कुटुंबे एकत्र येतात, आनंद आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करतात.
- दिवाळीचा एक अनोखा कलात्मक पैलू म्हणजे क्लिष्ट रांगोळीची निर्मिती, जी घरांच्या प्रवेशद्वारांना सुशोभित करते आणि उत्सवाच्या वातावरणात भर घालते.
- दिवाळी ही व्यक्तींमधील प्रेम, एकजूटता आणि दयाळूपणाचे महत्त्व लक्षात आणून देणारी आहे.
- एकता, सकारात्मकता आणि अंधारावर प्रकाशाच्या चिरंतन विजयाच्या चिरस्थायी मूल्यांचा पुरावा म्हणून दिवाळी उभी आहे.
- एकंदरीत, दिवाळी हा प्रेम सामायिक करण्याचा, कौटुंबिक बंध दृढ करण्याचा आणि सर्वांमध्ये सद्भावना वाढवण्याचा सण आहे.
माझा आवडता सण दिवाळी निबंध 10 ओळी – संच २
- दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि त्याला हजारो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक महत्त्व आहे.
- भारतीय पौराणिक कथेतील एक आदरणीय व्यक्तिमत्व भगवान रामाच्या काळात त्याचा उगम झाला असे मानले जाते, जे राक्षस राजा रावणाचा पराभव करून त्यांच्या राज्यात परतले.
- त्यांच्या विजयी पुनरागमनाची परंपरा दिव्यांच्या रोषणाईने साजरी करण्यात आली.
- कालांतराने, भारतातील सांस्कृतिक मूल्ये प्रतिबिंबित करणाऱ्या विविध पद्धतींचा समावेश करण्यासाठी दिवाळी विकसित झाली आहे.
- दिवे आणि मेणबत्त्या पेटवण्याव्यतिरिक्त, फटाके हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे, जो देखावा आणि उत्सवात भर घालतो.
- दिवाळी दरम्यान भेटवस्तूंची देवाणघेवाण प्रियजनांसोबत आनंदाची देवाणघेवाण करण्याची परंपरा दर्शवते.
- दिवाळी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात राहणारे भारतीय साजरी करतात.
- पाच दिवसांच्या दिवाळी सणात प्रत्येक दिवशी विशिष्ट विधी समाविष्ट असतात, जसे की संपत्ती आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करणे.
- या प्रथा भारतीय परंपरांच्या गहनतेचा आणि विविधतेचा पुरावा आहेत.
- एकंदरीत, दिवाळी हा भारताच्या सांस्कृतिक आणि इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे, जो वाईटावर चांगले, एकता आणि अंधारावर प्रकाशाचा कालातीत विजय या चिरस्थायी मूल्यांचा उत्सव साजरा करतो.
Diwali Essay in Marathi 10 Lines – संच ३
- दिवाळी, ज्याला दीपावली देखील म्हणतात, भारतातील विविध समुदायांद्वारे साजरी केली जाते.
- दिवाळीचे एक वैशिष्ट्य म्हणजे सजावटीच्या आणि रंगीबेरंगी रांगोळीची निर्मिती, जी रंगीत पावडर, तांदूळ आणि फुलांच्या पाकळ्यांसह विविध साहित्य वापरून तयार केली जाते.
- दिवाळीचा सण देखील भारतीय व्यावसायिक वर्षाच्या प्रारंभास सूचित करतो, अनेक व्यापारी आणि व्यापारी या दिवशी त्यांची नवीन लेखा पुस्तके सुरू करतात, ज्याला “चोपडा पूजन” म्हणून ओळखले जाते.
- ऐतिहासिकदृष्ट्या, दिवाळीचे अनेक अर्थ आणि मूळ आहेत.
- भारताच्या काही भागांमध्ये, भगवान कृष्णाने नरकासुराचा पराभव केल्याच्या दिवसाचे स्मरण केले जाते, तर काही भागांमध्ये, हे देवी कालीला समर्पित आहे.
- दिवाळी हा धार्मिक सीमा ओलांडून विविध धर्म आणि पार्श्वभूमीच्या लोकांना एकत्र करणारा एक धर्मनिरपेक्ष सण बनला आहे.
- दिवाळी हा असा काळ आहे जेव्हा सर्व वयोगटातील व्यक्ती अज्ञान आणि अंधारावर प्रकाश, ज्ञान आणि सत्याचा विजय साजरा करण्यासाठी एकत्र येतात.
- दिवाळीत फटाके फोडण्याची परंपरा आहे.
- थोडक्यात, दिवाळी हा केवळ सण नाही; हे सामायिक वारसा आणि मूल्यांचे प्रतिबिंब आहे.
- दिवाळी भारतातील वैविध्यपूर्ण लोकांना बांधून ठेवते, प्रत्येकाला चांगुलपणा, एकता आणि आपल्या जीवनातील अंधार दूर करणार्या चिरंतन तेजाच्या चिरस्थायी तत्त्वांची आठवण करून देते.
माझा आवडता सण दिवाळी निबंध 10 ओळी – संच ४
- दिवाळी हा भारतातील अनेक लोकांद्वारे साजरा केला जाणारा एक विशेष सण आहे.
- याला मोठा इतिहास आहे आणि तो दिव्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो.
- दिवाळी ही वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवते.
- लोक दिवे, मेणबत्त्या लावतात आणि रंगीबेरंगी रांगोळीने आपली घरे सजवतात.
- स्वादिष्ट मिठाई आणि जेवण वाटण्यासाठी कुटुंबे एकत्र येतात.
- प्रेम दाखवण्याची आणि इतरांना क्षमा करण्याची, आनंद पसरवण्याची ही वेळ आहे.
- लोक देवी-देवतांची पूजा करतात, विशेषत: देवी लक्ष्मी, जी संपत्ती आणि समृद्धी आणते.
- दिवाळीच्या उत्सवात फटाक्यांनी रात्रीचे आकाश उजळून निघते.
- या उत्सवादरम्यान भेटवस्तूंची देवाणघेवाण ही एक सामान्य परंपरा आहे.
- दिवाळी हा प्रेमाचा, एकत्र येण्याचा आणि आपल्या जीवनातील चांगुलपणा साजरा करण्याचा काळ आहे.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिवाळी निबंध 10 ओळी चे आवडले असतील. आम्हाला तुमचा diwali essay in marathi 10 lines साठीचा अभिप्राय कळवा.
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
- जीवन चरित्र
- ज्ञानवर्धक माहिती
- पक्षी माहिती
- प्राणी माहिती
(Top 5) दिवाळी निबंध मराठी | Diwali Essay in Marathi
मित्रांनो भारतीयांचा प्रमुख सण दिवाळी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी दरम्यान चारही बाजूंना उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहावयास मिळते. आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 4 उत्तम Diwali Essay in Marathi - दिवाळी निबंध मराठी शेअर करीत आहोत.
या लेखात देण्यात आलेले दिवाळी चे निबंध 100, 200, 300, 400 शब्द प्रकारात देण्यात आलेले आहेत. यापैकी आपल्याला आवश्यक असलेला निबंध आपण घेऊ शकता आणि त्याचा उपयोग करू शकतात. तर चला Diwali Essay in Marathi ला सुरूवात करूया.
दिवाळी 10 ओळी निबंध - Diwali essay in marathi 10 lines
- दिवाळी हा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
- भारतासह हा सण जगभरात राहणारे भारतीय देखील साजरा करतात.
- दिवाळीला दिव्यांचा सण म्हणूनही ओळखले जाते.
- दिवाळी येण्याआधी घराची व दुकानाची स्वच्छता केली जाते.
- दिवाळी च्या सणाला दिवे लाऊन प्रार्थना केली जाते.
- आम्ही दिवाळीच्या दिवशी आमची घरे रंगीबेरंगी रांगोळ्या, झेंडूच्या माळा आणि अनेक दिव्यांनी सजवतो.
- या दिवशी स्वादिष्ट मिठाई आणि इतर छान छान पदार्थ बनवले जातात.
- दरवर्षी दिवाळी ला माझे आई वडील मला नवीन कपडे घेऊन देतात.
- या दिवशी आम्ही मित्र आणि नातेवाईक मंडळींना मिठाई देतो.
- दिवाळी च्या सणाला कोणीही दुखी राहू नये म्हणून माझे वडील दरवर्षी गरिबांना मिठाई आणि गिफ्ट देत असतात.
दिवाळी निबंध मराठी - Diwali Essay in Marathi
(100 शब्द )
दिवाळी हा आपल्या भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. त्रेतायुगात भगवान श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतल्याच्या आनंदात अयोध्येत घरोघरी सर्वत्र दिवे लावले गेले, त्यामुळे संपूर्ण अयोध्या स्वर्गासारखी उजळून निघाली. श्री रामांचे अयोध्येतील आगमन म्हणूनच दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते.
दिवाळीचा सण प्रत्येकासाठी आनंद घेऊन येतो, मग व्यक्ति मोठा असो वा लहान सर्वजण खूप उत्साहाने दिवाळी साजरी करतात. दिवाळी दरम्यान शाळा, कॉलेजांना सुट्ट्या दिल्या जातात. दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते.
दिवाळीचा सण फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अनेक देशांमध्ये खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. सर्वत्र दिवे आणि आकाशकंदील लावले जातात, रांगोळ्या काढल्या जातात, फटाके फोडले जातात आणि स्वादिष्ट फराळही केला जातो.
अशा प्रकारे दिवाळी हा एक आनंदाचा उत्सव आहे जो आपल्या जीवनात आनंद, प्रेम आणि बंधुता पसरवतो.
दिवाळीचा सण निबंध - Diwali Festival Essay in Marathi
दिव्यांचा सण म्हणून ओळखला जाणारा दिवाळी हा भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. दिवाळी सणाला भारताच्या काही भागांमध्ये ‘दिपावली’ म्हणूनही ओळखले जाते.
भगवान श्रीराम यांनी १४ वर्षांच्या वनवासादरम्यान रावणाचा वध करून अधर्मावर विजय मिळवला आणि अयोध्येला परत आले, तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी दिवे लावले. व मान्यतेनुसार तेव्हापासूनच दिवाळी साजरी केली जाते.
दिवाळीची तयारी काही दिवस आधीपासून सुरू होते. या शुभ सोहळ्यासाठी घरे आणि दुकाने स्वच्छ केली जातात, घरांना रंग देऊन त्याचे नूतनीकरण केले जाते. लोक नवीन कपडे, दागिने, दिवे, मिठाई खरेदी करतात. यादरम्यान सर्वत्र अत्यंत उत्साहाचे वातावरण असते.
धनत्रयोदशी पासून भाऊबीजपर्यंत ५ दिवस दिवाळी अगदी उत्साहात साजरी केली जाते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे दिवाळीचे पाच दिवस प्रत्येक घरी आनंद घेऊन येतात.
दिवाळीच्या दिवशी, लोक नवनवीन कपडे आणि दागिने परिधान करतात, घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात. घरातील खोल्या, बाल्कनी आणि बागांमध्ये दिवे आणि आकाशकंदील लावून सजावट केली जाते. यामुळे घर अगदी उजळून निघते. घरी स्वादिष्ट फराळ केला जातो. शेव, चकली, चिवडा, शंकरपाळे असा फराळ अतिशय चवीने खाल्ला जातो आणि इतरांनाही दिला जातो.
दिवाळी हा अनेक शतकांपासून संपूर्ण भारतातील लोकांद्वारे साजरा केला जाणारा आनंददायक सण आहे. दिवाळी केवळ घरांनाच नव्हे तर लोकांच्या आत्म्याला देखील प्रकाश देते. असा हा सण समाजातील लोकांना जवळ आणतो आणि आपल्यामध्ये एकतेची भावना निर्माण करतो.
वाचा> माझा आवडता सण दिवाळी निबंध
मराठी निबंध दिवाळी - Diwali Essay in Marathi
भारतात सणांची गौरवशाली परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. घरातील अंधार दूर करून दिव्यांचा प्रकाश पसरवणारी दिपावली किंवा दिवाळी सर्व सणांमध्ये सर्वात मुख्य सण आहे.
लंका-विजयानंतर प्रभू श्रीराम अयोध्येला परतले तेव्हा अयोध्यावासीयांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून हा उत्सव लोकप्रिय झाला. महाराज युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ याच दिवशी पूर्ण झाला होता, तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो, असेही मानले जाते. काही लोक दिवाळीला भगवान महावीरांचा निर्वाण दिवस मानतात. अशा प्रकारे दिवाळीच्या सणात प्रत्येक भारतीयाला आत्मीयता जाणवते.
दिवाळी आपल्याबरोबर स्वच्छता आणि सजावटीचा सुवर्ण संदेश घेऊन येते. दिवाळी येण्याच्या काही दिवस आधीच, लोक आपली घरे साफ करण्यास सुरवात करतात. लोक नवीन कपडे खरेदी करतात आणि दागिनेही खरेदी करतात. घरगुती मिठाई आणि पदार्थ तयार केले जातात. अशाप्रकारे दिवाळीच्या आगमनापूर्वी सर्वत्र उत्साहाची आणि जल्लोषाची लाट उसळते.
धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत ५ दिवस दिवाळी अगदी उत्साहात साजरी केली जाते. घरोघरी दिवे, आकाशकंदील आणि विजेचे बल्ब पेटवले जातात. फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण दुमदुमून जाते. धनत्रयोदशीला लोक धनाची आणि संपत्तीची पूजा करतात. चतुर्दशीला 'नरक चतुर्दशी' असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या असूराचा वध केला होता.
अमावास्येचा दिवस म्हणजे दिवाळीचा मुख्य दिवस. या दिवशी लक्ष्मीपूजन असते. याच दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते आणि व्यापारी नवीन हिशोबाच्या वह्यांची पूजा करतात. नवीन विक्रम वर्ष दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते. या दिवशी लोक आपल्या नातेवाईकांना भेटतात आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते आणि त्याला मिठाई खाऊ घालते. भाऊ बहिणीला काही भेटवस्तू देतो.
काही लोक दिवाळीच्या दिवशी पत्ते खेळतात. दिवाळीत खूप फटाके फोडले जातात. यामुळे काहीवेळा भीषण आग लागण्याच्या घटना घडतात. म्हणून आपण फटाके फोडताना काळजी घेतली पाहिजे.
दिवाळीच्या प्रकाशाने आपले घर, अंगण आणि त्याचबरोबर आपले मनही उजळून निघते. आपल्या हृदयातून दुसऱ्यांबद्दल असलेला राग, द्वेष आणि दुरावा काढून टाकला जातो. आपले मन प्रेमाने भरले जाते. यातून सर्वांना नवचैतन्य प्राप्त होऊन आपली कर्तव्ये पार पाडण्याचे बळ मिळते.
हे दीपमालिके, आनंद आणि प्रकाशाची देवी! तुझे नेहमीच स्वागत आहे!
दिवाळी मराठी निबंध - Diwali Composition in Marathi
कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरा होणारा दीपावली हा सण केवळ हिंदू धर्मासाठीच नाही तर जैन, बौद्ध, शीख इत्यादी धर्मांसाठीही महत्त्वाचा आहे. हा सण साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आणि सांस्कृतिक श्रद्धा आहेत.
आपल्या देशातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक, दीपावली किंवा दिवाळी म्हणजे पाच दिवसांचे महापर्वच आहे, हा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजेपर्यंत चालतो, या सर्व दिवसांचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे, यामागे पौराणिक आणि धार्मिक कथा जोडल्या आहेत.
दिवाळीच्या दिवशी लोक आपली घरांची, दुकानांची साफ-सफाई करतात. घरांना रंग लावतात आणि या निमित्ताने नवीन कपडे, भेटवस्तू, भांडी, मिठाई इत्यादी खरेदी करतात. नवीन दुकाने आणि घरे घेण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवाळी एक शुभ दिवस मानला जातो. Diwali Essay in Marathi
दिवाळीच्या पहिल्या दिवशी येते धनत्रयोदशी. हा दिवस घरासाठी काही खरेदी करण्याचासाठी शुभ मानला जातो. या दिवशी धनाची पूजा केली जाते आणि लोक सोने, चांदी यांचीही खरेदी करतात. लोक हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही अनुकूल मानतात.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला होता. हा वध अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे.
तिसरा दिवस असतो लक्ष्मीपूजनाचा. हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी लोक रांगोळी आणि दिव्यांनी घर सजवून संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करतात. लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि गणेश ही शुभ सुरुवातीची देवता मानली जाते.
दिवाळीला लोक रस्ते, बाजारपेठा, घरे आणि आजूबाजूच्या परिसरात समृद्धी आणि कल्याणासाठी मातीचे दिवे लावतात.
यावेळी फटाके हे प्रमुख आकर्षण असते. घरात बनवलेला स्वादिष्ट फराळ खाल्ला जातो आणि शेजारी, मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना सुद्धा दिला जातो.
लक्ष्मीपूजनाच्या रात्री १२ वाजेपर्यंत लोक लक्ष्मीच्या दर्शनासाठी आतुरतेने घराचे दरवाजे उघडे ठेवतात.
दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा आणि गोवर्धन पूजेचा दिवस.
याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने इंद्राचा पराभव केला आणि इंद्र पाडत असलेल्या मुसळधार पावसापासून ग्रामस्थ आणि गुरेढोरे यांना वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या एका करंगळीवर उचलला होता.
उत्तर भारतात सायंकाळी खत, ऊस, पुस्तके, शस्त्रे व उपकरणे इत्यादींची पूजा या निमित्ताने केली जाते.
महाराष्ट्र, तमिळनाडू आणि कर्नाटकातील लोक हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून साजरा करतात ज्यात भगवान श्रीविष्णूंच्या वामन अवताराने राक्षस राजा बळीवर मिळवलेल्या विजयाची आठवण काढली जाते.
भाऊबीजेचा दिवस हा दिवाळीचा शेवटचा दिवस. हा दिवस भाऊ-बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक आहे. बहीण आपल्या भावाचे औक्षण करते आणि त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतात.
दिवाळीचा सण देशभरातील सर्व लोक अतिशय उत्साहाने साजरा करतात. मुलांना सणाचा आनंद लुटता यावा म्हणून शाळा, महाविद्यालयात काही दिवस सुट्टी दिली जाते. बँका नवीन योजना आणि व्याजदर देतात. दरवर्षी या निमित्ताने मोठ्या बजेटचे नवीन चित्रपट प्रदर्शित होतात.
दिवाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. यामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे आपण फटाके फोडताना कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
दिवाळी हा उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे. दिवाळीच्या निमित्ताने आपल्या हृदयातून दुसऱ्यांबद्दल असलेला राग, द्वेष आपण काढून टाकला पाहिजे आणि सर्वत्र प्रेम आणि आनंद पसरवला पाहिजे.
तर मित्रहो वरील लेखात आम्ही आपल्यासाठी 4 वेगवेगळी शब्ददमर्यादा असणारे दिवाळी मराठी निबंध दिले आहेत. आशा आहे हे Diwali Essay in Marathi आपणास उपयोगी ठरले असतील. diwali festival essay in marathi आपण आपल्या शालेय कार्यासाठी उपयोगात घेऊ शकतात. तसेच परीक्षेत देखील आपणास दिवाळी सण मराठी निबंध विचारला जातो, तर तेथे देखील हा निबंध उपयोगी ठरू शकतो.
टिप्पणी पोस्ट करा
- Birthday Wishes in Marathi
Contact form
दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi
जर तुम्ही दिवाळी निबंध मराठीमध्ये । Diwali Essay in Marathi । Essay on Diwali in Marathi शोधत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्ट मध्ये आपण दिवाळी निबंध मराठी मध्ये अगदी योग्य शब्दात पहाणार आहोत. Essay on Diwali in Marathi सोबत इतरही निबंध वाचायला विसरू नका. दिवाळी हा भारतातील प्रमुख सणांपैकी असल्याने शाळेमध्ये आपल्याला हमखास यावर निबंध परीक्षेमध्ये विचारला जातो. सोबत इतर निबंध स्पर्धांमध्ये हा विषय हमखास असतोच. यासाठी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत दिवाळी या भारतीय सणावर मराठीत निबंध (Diwali Nibandh in Marathi)
दिवाळी निबंध मराठी मध्ये । Essay on Diwali in Marathi (जास्त शब्दांमध्ये)
आपला भारत देश हा सणांचा देश आहे आणि प्रत्येक समाज सण आणि उत्सवांच्या निमित्ताने एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त करतो. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी हा शब्द संस्कृत भाषेतून घेतला गेला आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दिवाळी साजरी केली जाते. तसे पहायला गेले तर दसऱ्यापासूनच घराघरात दिवाळीची तयारी सुरु होत असते. दिवाळी पूर्ण भारतभर मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात साजरी केली जाते. दिवाळीमध्ये लोकांमध्ये खूप उत्साह संचारतो. पण दिवाळी केवळ भारतातच साजरी होते असे काही नाही तर भारताबाहेरही साजरी केली जाते. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय लोकांमुळे दिवाळी भारताबाहेरही प्रसिद्ध आहे. दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा ना राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला. दिवाळी विषयी बऱ्याच गमतीजमती आहेत. दिवाळी हा सण साजरा करण्यामागे बरीच करणे आहेत जी हिंदू पुराणांमध्ये तसेच इतर साहित्यातही आहे.
प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वाढ केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे दुसऱ्या दिवशी गोकुळवासियांनी दिवे लावून आनंद साजरा केला होता.
देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसाचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान श्री शंकराने स्वतः देवीच्या चरणी लोटांगण घातले. तेव्हा महाकालीचा राग शांत झाला होता. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे.
बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रिलोकात विजय मिळवला होता. या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून वीसहून वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायात दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्रिलोक घेतले. बळीच्या दानशूरपणा मुळे प्रसन्न झालेल्या वीसहून त्याला पाटलाचे राज्य देऊन भू-लोकवासी त्याची आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले.
शिखांचे सहावे गुरु हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतून सुटून कार्तिक अमावास्येच्या दिवशी अमृतसरला आले होते. त्यामुळे शिख लोकही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते. इसवी सन पूर्व ५०० वर्षांपूर्वी मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीनुसार त्याकाळी दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजले जाते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जळत असावेत असे दिसून आले आहे. इसवी सन पूर्व २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती अशी आख्यायिका आहे. त्यामुळे बौद्ध धर्मात या दिवाळीला खूप महत्व आहे. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील चाणक्य यांच्या अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि घाटावर म्हणजेच नदी किनारी मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात.
सम्राट विक्रमादित्य या राजाचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्याच दिवशी तेथील प्रजेने खूप मोठ्या प्रमाणात दिव्यांची रोषणाई राज्यभर केली होती. प्रजेने दिवे लावून आपला आनंद व्यक्त केला होता.जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शरीराचा त्याग केला होता. ‘महावीर संवत’ त्यांच्या दुसऱ्या दिवशी सुरु होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरुवात मानतात. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंतरज्योती कायमची विझून गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बहिर्ज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रात सांगितले आहे.
पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना ‘ओम’ म्हणून समाधी घेतली होती. महर्षी दयानंद यांनी दिवाळीच्या दिवशीच अजमेर जवळ समाधी घेतली होती. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती, मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यात ४० गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असे. यावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादूरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत. शाह आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत.
दिवाळी या सणाचे मूळचे नाव ‘यक्षरात्री’ असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्साययनाच्या कामसूत्रात हेच नाव नोंदलेले आहे. ‘नीलमत’ या ग्रंथात या सणाला “दीपमाला” असे म्हटले आहे. कनोजचा राजा हर्षवर्धन याने नागानंद या नाटकात या सणाला “दीपप्रतिपादूत्सव” असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात “दिवाळी” हा शब्द वापरला आहे. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला “दिपालीका” म्हटले आहे, तसेच कालविवेक या ग्रंथात तिचा उल्लेख “सुखरात्रि” असा येतो. व्रत प्रकाश नावाच्या ग्रंथात “सुख सुप्तिका” म्हणून दिवाळी ओळखली जाते.
दिवाळी आल्याचा निसर्गाला बरोबर कस काय कळतं? कसा हलकेच हवेत गारवा येतो? चोरपावलांनी हळूच मागे येऊन डोळे झाकत मिठी घालणाऱ्या सखीसारखी थंडी बरोबर पहाटे कशी आपल्या दुलईत शिरते? दसऱ्याच्या आधी नदीवर धुवून वाळवलेल्या गोधडीसारखी सगळी झाडं- पान -फुलं एकदम अशी हिरवी स्वच्छ दिसू लागतात कशी? निसर्गात दिवाळी आधी येते आणि मग ती हळूच आपल्या तनामनात उतरते, हे खरं . आपले सगळे सण निसर्गाशी नातं जोडून आहेत. म्हणूनच तर चार महिने दंगा घालणारा पाऊस हलके हलके एक्झिट घेतो आणि थंडीचे आगमन होते. दसऱ्यानिमित्त घरातील जळमटे निघालेले असतात. कोपरा कोपरा साफ झालेला असतो. पंख्यावरची, कपाटावरची धूळ झटकलेली असते.
दिवाळीनिमित्त बाजारही रंगलेला असतो. मग सुखाची साधनं घरात येतात. सर्वांच्या चेहऱ्यावर एक नवीन येत . सारा आसमंत या उत्साहात न्हाऊन जातो. घरासमोर टांगलेला आकाश कंदील, पणत्यांची रांग, फुलबाज्या, भुईचक्र, मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीला लावलेला आंब्याच्या पानाचे आणि झेंडूच्या फुलाचे तोरण, दारासमोर मोठमोठ्याल्या रांगोळ्या हे सगळे पहिले कि दिवाळीला सर्व सणांची राणी का म्हणतात हे समजत. मुलं घरासमोर मातीचे छोटे-छोटे किल्ले बांधतात. घरात लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा यांचा घमघमाट सुटलेला असतो. मिठाईचे डब्बे घरी येतात.
आपला देश हा कृषीप्रधान देश. आपली संस्कृती सुद्धा सर्वांवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच कि काय वसुबारस या दिवशी आपण गाय आणि वासरू यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दूध-दुभत्यासाठी होणार गायीचा उपयोग शेतीच्या कमी बैलाची होणारी मदत या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची कृतज्ञतेने केलेली ही पूजा. धनत्रयोदशीला तिन्हीसांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणा धने-गुळाचा प्रसाद याला ही फार मोठे महत्व आहे. याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावेल जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते. नरकचतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी पहाटे उठून उटणे,सुगंधी तेल लावून मोठी साबणाने स्नान करायचे. नवीन कपडे घालून देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र मिळून केलेला फराळ खायचा. घरातील सोने नाणे, रोकड यांची पूजा केली जाते. या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी (केरसुणी) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी केली जाते.
पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा, साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना, साडी भेट करतो. कार्तिक सुद्धा द्वितीयेला यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहीण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहीण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.
अशाप्रकारे दिवाळीचे तीन ते चार दिवस अगदी मजेत जातात. शाळेलाही सुट्टी असल्याने मुलेही खूप आनंदी असतात पण त्यांना शाळेच्या अभ्यासापासून सुटका मिळत नाही कारण दिवाळी चा गृहपाठ शाळेने दिलेला असतो त्यामुळे सुट्टी असली तरी अभ्यास हा करावाच लागतो. मग थोडा वेळ खेळ, थोडा अभ्यास, थोडा आराम करत दिवस जातो. काही मुले गावी जाऊन या सणाचा आनंद घेतात. रानावनात जाऊन हा दिवस सर्व परिवारासोबत साजरा करतात. गावाकडे सगळी भावंडे वर्षातून एकदा भेटतात. घरातील वातावरण उत्साहाचे असते. सारे मिळून फराळ खातात. तसेच लांब असलेल्या नातेवाईकांना भेटवस्तू, शुभेच्छा पात्र इ. देऊन आनंद व्यक्त केला जातो. घरोघरी फराळाचे डबे भरून दिले जातात. अशाप्रकारे आनंद एकमेकांना वाटला जातो.
आजकाल सगळ्यांनी गावाला एकत्र येऊन दिवाळी प्रमाण तसे कमी आले आहे. त्याऐवजी लोक आता पर्यटनस्थळी दिली साजरी करतात.शहरातल्या गजबजाटापासून दूर जावसं वाटतं आणि निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावरच दिवाळी वाटणं, हे स्वाभाविकच आहे. नातलग एकत्र येण्याचा प्रमाण शहरात तरी कमी होत चालल आहे त्यामुळे पूर्वीसारखी रंगत पाहायला मिळत नाही. दिवाळी साजरी करायची पद्धत बदलत चालली आहे. आजकाल बाजारात हवे ते पदार्थ वर्षभर उपलब्ध असतात त्यामुळे दिवाळीच्या वेळीच ते पदार्थ खाण्याच अस काही अप्रूप राहत नाही. पूर्वी नवीन कपडे घेण्यासाठी दिवाळीची वाट पाहावी लागायची तशी आता पहिली जात नाही. कधीही शॉपिंग करून आपण ते घेऊ शकतो.
अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांना प्रिय आहे. तो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे परमोच्च सुखाचा अत्यंत आनंदी सण. सुखद दीपावलीच्या अनेक आठवणी पुढे अनेक दिवस मनात रेंगाळत राहतात.
आशा आहे की दिवाळी निबंध मराठी मध्ये । Essay on Diwali in Marathi | Diwali Nibandh in Marathi तुम्हाला नक्की आवडला असेल. या निबंधा सोबत खालील निबंध वाचायला विसरू नका.
इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :
१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)
२. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध (Best: Independence Day Essay in Marathi)
३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)
४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये
५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)
६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)
७. माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi
८. माझी आई निबंध मराठी (Top 3 Essay on my mother in Marathi)
९. माझी शाळा निबंध मराठी (Best My School Essay in Marathi for Class 6 to 9)
मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
IMAGES
VIDEO
COMMENTS
Essay On Diwali In Marathi – (500 शब्द ) दिवाळी वर मराठी निबंध. दिवाळीचे दुसरे नाव ‘दीपावली’ आहे. या सणाचा अर्थ ‘दीपोत्सव’ किंवा ‘प्रकाशोत्सव’ असा आहे.
दिवाळी (essay on diwali in marathi) हा सण आश्विन या मराठी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. इंग्रजी दिनदर्शिका नुसार दिवाळी हा सण ...
तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी दिवाळी सणावर मराठी माहिती निबंध (Diwali information in Marathi) वापरू शकता.
१) दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. २) दिवाळी हा भारतात साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव आहे. ३) दिवाळी म्हणजे १४ वर्षांच्या वनवासानंतर भगवान रामला अयोध्येत परत येण्याचा उत्सव. ४) या सणाला आम्ही दिव्यांच्या रोषणाईने आणि रांगोळीने घराची सजावट करीत असतो. ५) दिवाळीच्या दिवशी आम्ही देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतो.
Essay On Diwali : Diwali, a festival of light is the most popular festival in India which symbolizes the spiritual “victory of good over evil, light over darkness, and knowledge over ignorance”. This year Diwali is going to be celebrated from 10th November to 15th November 2023.
Diwali Essay in Marathi: यावर्षी दिवाळी २८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. सोमवारी (ता. २८) वसुबारसपासून दिवाळीची सुरूवात होत आहे. त्यादिवशीच रमा एकादशीही आहे. यंदा दिवाळी दोन महिन्यांमध्ये आली आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी सुरू होते आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपते.
Diwali Essay in Marathi - हिंदू calendar नुसार, दिवाळी कार्तिक महिन्यात अमावस्या (अमावस्या) रोजी येते. हिंदू धर्मातील हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो.
अगदी इंग्रजी माध्यमासाठीही, Diwali Essay in Marathi 10 Lines मध्ये विचारला जाऊ शकतो. Table of Contents hide. 1 दिवाळी निबंध 10 ओळी – संच १. 2 माझा आवडता सण दिवाळी निबंध 10 ...
दिवाळी मराठी निबंध - Diwali Composition in Marathi. (400 शब्द) कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरा होणारा दीपावली हा सण केवळ हिंदू धर्मासाठीच नाही तर ...
Essay on Diwali in Marathi सोबत इतरही निबंध वाचायला विसरू नका. दिवाळी हा भारतातील प्रमुख सणांपैकी असल्याने शाळेमध्ये आपल्याला हमखास यावर निबंध ...